Mahindra Bolero Neo Plus: आता 7 सीटर कार विसरा, Mahindra आणतेय 9 सीटर एसयूव्ही, मिळणार Thar चं इंजिन; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:45 IST2022-09-20T17:44:10+5:302022-09-20T17:45:02+5:30
Mahindra Upcoming Car launch: महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी कार Mahindra Bolero आहे. ही गाडी Bolero आणि Bolero Neo अशा दोन मॉडेल मध्ये येते.

Mahindra Bolero Neo Plus: आता 7 सीटर कार विसरा, Mahindra आणतेय 9 सीटर एसयूव्ही, मिळणार Thar चं इंजिन; जाणून घ्या किंमत
महिंद्रा आपल्या एसयूव्ही गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या कंपनीची स्कॉर्पियो एन आणि XUV700 वर सर्वाधिक वेटिंग आहे. मात्र, असे असले तरी महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी कार Mahindra Bolero आहे. ही गाडी Bolero आणि Bolero Neo अशा दोन मॉडेल मध्ये येते. आता कंपनी हिचे आणखी एक मॉडेल घेऊन येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, महिंद्रा लवकरच Mahindra Bolero Neo Plus नावाने एक नवी गाडी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, या गाडीला थारला असलेले डिझेल इंजिनच दिले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार महिंद्रा बोलेरो निओ प्लसमध्ये 2.2 लीटरचे mHawk डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. हेच इंजिन महिंद्रा थारमध्येही देण्यात आले आहे. मात्र, बोलेरो नियो प्लसमध्ये हे इंजिन ट्यून केले जाऊ शकते. ही गाडी 7 सीटर आणि 9 सीटर व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. हिचे एक अॅम्ब्युलन्स व्हर्जनही असेल. यात 4 सीट्स सोबत एक बेड असेल.
किती असेल किंमत? -
या गाडीची किंमत 10 लाख रुपयांपासून ते 12 लाख रुपयांपर्यंत असू शकते. डायमेंशनसंदर्भात बोलायचे झाल्यास बोलेरो नियो प्लसची लांबी 4400mm, तर रुंदी 1795mm आणि ऊंची 1812mm एवढी असू शकते. तर हिचे व्हीलबेस 2680mm एवढे असेल.
बोलेरो नियो प्लसनंतर, कंपनी महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे. ही एसयूव्ही जानेवारी 2023 मध्ये येण्याची शक्यता. ही कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. या एसयूव्हीमध्ये 39.5kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 148bhp आणि 310Nm डिलिव्हर करतो. ही गाडी 8.6 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रति तास एवढा वेग धारण करते. तसेच हिची टॉप स्पीड 150 किमी प्रति तास एवढी आहे.