शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

अंबानी-अदानी नाही, तर 'या' भारतीयांकडे आहे सर्वात महाग नंबर प्लेटची गाडी; पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:41 IST

अनेकांना आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर असावा वाटतो, पण असा नंबर सहजासहजी मिळत नाही.

Top 5 Most Expensive Number Plates : जगभरात अनेकजण आहेत, जे महागड्या गाड्या वापरण्यासोबतच आपल्या गाड्यांसाठी अनोखी/व्हीआयपी नंबर प्लेट घेतात. भारतातदेखील अनेकांकडे व्हीआयपी नंबरप्लेट असलेल्या गाड्या आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, देशातील सर्वात महागड्या नंबर प्लेट वापरणाऱ्यांमध्ये अदानी-अंबानी यांचे नावे नाहीत. 

भारतातील सर्वात महागड्या नंबर प्लेट्स आणि त्यांचे मालक

आशिक पटेल  (Toyota Fortuner - ‘007’)भारतातील सर्वात महाग नंबर प्लेट आशिक पटेल यांच्या टोयोटा फॉर्च्युनरवर आहे. या गाडीचा नंबर '007' असून, या नंबर प्लेटची किंमत 34 लाख रुपये आहे. हा आकडा जेम्स बाँडच्या चित्रपटांवरुन प्रेरित आहे, ज्यामुळे या नंबरची किंमत जास्त आहे.

के. एस. बालगोपाल (Porche 718 Boxster - ‘KL-01-CK-1’)दुसऱ्या क्रमांकावर के. एस. बालगोपाल यांचे नाव आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांपैकी एक असलेली Porche 718 Boxster आहे. या गाडीचा नंबर ‘KL-01-CK-1’ मिळवण्यासाठी त्यांनी 31 लाख रुपये मोजले आहेत. 

के. एस. बालगोपाल (Toyota Land Cruiser LC200 - ‘KL01CB0001’)के. एस. बालगोपाल यांच्याकडे  आणखी एक कार आहे, जिचा नंबरदेखील महागड्या नंबर प्लेटच्या यादीत येतो. त्यांच्याकडे Toyota Land Cruiser LC200 आहे, ज्याचा नंबर  ‘KL01CB0001’ असून त्याची किंमत 18 लाख रुपये आहे.

जगजित सिंग (Toyota Land Cruiser LC200 - ‘CH01AN0001’)जगजीत सिंग यांच्याकडे असलेल्या टोयोटा लँड क्रूझर LC200 साठी त्यांनी 17 लाख रुपयांचा 'CH01AN0001' नंबर मिळवला आहे.

राहुल तनेजा (Jaguar XJL - ‘RJ45CG0001’)राहुल तनेजा यांच्याकडे Jaguar XJL असून, त्या गाडीची नंबर प्लेट 'RJ45CG0001' आहे. यासाठी त्यांनी 16 लाख रुपये मोजले आहेत.

मुकेश अंबानीआपण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कारच्या नंबर प्लेटबद्दल बोललो, तर त्यांच्या BMW 7-Series च्या नंबर प्लेटची किंमत 9 लाख रुपये आहे. हा नंबर “MH 01 AK 0001” आहे. 2022 मध्ये अंबानी यांनी एक रोल्स रॉयस खरेदी केली, ज्याचा नंबर '0001' आहे. यासाठी त्यांनी 12 लाख रुपये मोजले. 

टॅग्स :AdaniअदानीGautam Adaniगौतम अदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीAutomobileवाहनcarकारbusinessव्यवसायJara hatkeजरा हटके