Nissan Magnite ब्रेझा, सोनेटला टक्कर देणार; 20 चे मायलेज आणि बरेच काही

By हेमंत बावकर | Published: October 22, 2020 03:08 PM2020-10-22T15:08:15+5:302020-10-22T15:09:28+5:30

Nissan Magnite : भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे. 

Nissan Magnite unveiled in India; 20 Kmpl mileage and more | Nissan Magnite ब्रेझा, सोनेटला टक्कर देणार; 20 चे मायलेज आणि बरेच काही

Nissan Magnite ब्रेझा, सोनेटला टक्कर देणार; 20 चे मायलेज आणि बरेच काही

Next

निसान इंडियाने नुकतेच सब कॉम्पॅक्ट एसयुव्हीचे अनावरण केले. भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे. 


या नव्या छोट्या एसयुव्हीमध्ये लाइट्सएबर-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह अत्यंत शैलीदार असे हेडलँप्स, एल-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), डॉमिनेटिंग फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत.  ६०-४० स्प्लिट फोल्टेबर रिअर सीटही देण्यात आली आहे. यामुळे लगेज स्पेस वाढविता येते. लगेज स्पेसची क्षमता ३३६ लीटर एवढी आहे. 

लँड रोव्‍हर डिफेन्डर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स


वेलकम अॅनिमेशनसह ७ इंची टीएफटी मीटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, फुल फ्लश टचस्क्रीनसह ८ इंची इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो व बिल्ट इन व्हॉइस रेकग्निशन आदी देण्यात आले आहे. ही कार 20 किमी प्रति लिटरचे मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. एचआरएओ १.०-लीटर टर्बो इंजिन देणअयात आले आहे. मॅन्युअल ५ स्पीड आणि एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 
सुरक्षेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट (एचबीए), वेहिकल डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम (टीसीएस), हिल स्टार्ट असिस्ट (एचएसए), स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, सेंट्रल लॉकिंग, एसआरएस ड्युअल एअरबॅग सिस्टिम विथ प्रेझेंटेशन व लोडलिमिटर सीटबेल्ट आदी प्रणाली देण्यात आल्या आहेत. 

पोलीस वाहनचालकांना थांबवणार नाहीत म्हणजे काय भाऊ?


ही सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही मारुतीच्या ब्रेझा, फोर्डच्या इकोस्पोर्ट, टोयोटाच्या अर्बन क्रूझर, ह्युंदाईच्या व्हेन्यू, कियाच्या सोनेट आणि टाटाच्या नेक्सॉनला टक्कर देणार आहे. 

टोयोटाची अर्बन क्रूझर

नवीनतम अर्बन क्रुजरमध्ये नवीन शक्तिशाली के-सिरीज इंजिन आहे. हे १.५ लीटरचे चार सिलेंडर वाले पेट्रोल इंजिन आहे ज्यामध्ये इंधन कार्यक्षमतेसाठी मॅन्युअल ट्रांसमिशन (एमटी) १७.०३ केएमपीएल आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशन (एटी) १८.७६ केएमपीएल असे दोन पर्याय देखील उपलब्ध आहे. कॉम्पॅक्ट एसयूवीमध्ये सर्वोच्च वैशिष्टये आहेत ज्याची मागणी आजचा प्रत्येक ग्राहक त्यांच्या कारसाठी करतो. याव्यतिरिक्त, हे तरुणांना टोयोटा एसयूवी कुटुंबात लवकर प्रवेश करण्याची संधी देते आणि टोयोटाच्या विक्री आणि विक्रीनंतरच्या प्रसिद्ध जागतिक मानकांचा अनुभव देखील प्रदान करते.

Kia Sonet लाँच; Maruti brezza, Tata Nexon ला टक्कर देणार, जाणून घ्या किंमत

नेहमीप्रमाणेच टोयोटासाठी ग्राहकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे. या अर्बन क्रूजरमध्ये ड्युअल एयरबॅग्स, आणि ईबीडीसह एबीएस अँडवांस बॉडी स्टक्चर इलेक्ट्रोक्रोमिक आईआरवीएम, हिल होल्ड कंट्रोल,ऑडिओमध्ये डिसप्लेसह रीवर्स पार्किंग कॅमेरा आणि आईएसओएफआईएक्स चाइल्ड सीट रेसट्रेन्ट सिस्टमसह उपलब्ध आहे.

Web Title: Nissan Magnite unveiled in India; 20 Kmpl mileage and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app