शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

Alto K10 पेक्षाही स्वस्त आहे ही SUV! फीचर्स 'लाजवाब' अन् तेवढीच सुरक्षितही, जाणून घ्या मायलेज अन् प्राइस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:38 AM

आपल्या घरासमोर एखादी कार असावी, असे जवळपास सर्वांनाच वाटत असते. त्यातही एखादी चांगली आणि दमदार SUV असेल तर उत्तमच.

भारतीय कार बाजारात सध्या SUV कारचा जबरदस्त बोलबाला आहे. आपल्या घरासमोर एखादी कार असावी, असे जवळपास सर्वांनाच वाटत असते. त्यातही एखादी चांगली आणि दमदार SUV असेल तर उत्तमच. कारण रास्ता कितीही अवघड असला, तरी या कारमधून प्रवास सोपा होतो. मात्र सर्वच जण SUV विकत घेऊ शकत नाही. अनेक जण तर आपल्या बजेटमुळे यांचा विचारही करत नाहीत. कारण हिच्या किंमतीच जवळपास 10 लाख पासून सुरू होतात. अशातच बाजारात एक जबरदस्त SUV कार आली आहे. जी दमदारही आहे आणि बजेटमध्येही आहे.

Alto K-10 पेक्षा स्वस्त SUV -आज आम्ही आपल्यासाठी Alto K-10 पेक्षाही स्वस्त SUV चा पर्याय घेऊन आलो आहोत. महत्वाचे म्हणजे हिचे फीचर्सदेखील जबरदस्त आहेत. एवढेच नाही, तर हिचे मायलेजही जबरदस्त आहे. तसेच परफॉर्मेंसच्या बाबतीतही, हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 

निसान मॅग्नाइट -या कारचे नाव आहे मॅग्नाइट (Nissan Magnite). आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, मॅग्नाइट आणि तीही ऑल्टोपेक्षा स्वस्त? पण हो हे खरे आहे. कारण हिच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत साधारणपणे 6 लाख रुपये एवढी आहे. तर ALTO K10 चे CNG व्हेरिअँट 7 लाख रुपयांपर्यंत जाते. महत्वाचे म्हणजे, निसान मॅग्नाइटला 4 स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळालेली आहे. अर्थात ही कार सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ठीक आहे.

मायलेज, फीचर्स आणि किंमत -आपल्याला मॅग्नाइटमध्ये 4 व्हेरिअँट्स आणि दोन इंजिन ऑप्‍शन मिळतात. यात भरपूर स्पेससह इंफोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल ड्रायव्हर डिस्‍प्ले, मल्टी फंक्‍शन स्टीअरिंग व्हील, 2 एअरबॅग, वॉशरसह रियर डिफॉगर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओव्हीआरएम, एबीएस, ईबीड आणि रियर व फ्रंट पॉवर विंडो सारखे फीचर्स मिळतात.

मॅग्नाइटच्या मायलेज संदर्भात विचार करता, ही कार 22 किलोमीटर प्रति लीटरहूनही अधिकचे मायलेज देते. या कारमध्ये आपल्याला 1.0 लिटर नॅच्युरल एस्‍पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. जे 71 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम एवढा टार्क जनरेट करते. तसेच दुसऱ्या इंजिन ऑप्शनमध्येही 1.0 लिटरचे टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. ही कार मॅन्युअल आणि सीव्हीटी, अशा दोन्ही प्रकारच्या गिअरबॉक्समध्ये ऑफर केले जाते. 

टॅग्स :AutomobileवाहनNissanनिस्सानcarकारAutomobile Industryवाहन उद्योग