शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:52 IST

Nissan Magnite Extended Warranty: ऑटोमोबाईल बाजारात आता वॉरंटी देण्याची स्पर्धा लागली आहे. टाटाने आपल्या ईलेक्ट्रीक कारवर १५ वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे.

ऑटोमोबाईल बाजारात आता वॉरंटी देण्याची स्पर्धा लागली आहे. टाटाने आपल्या ईलेक्ट्रीक कारवर १५ वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. आधीच कंपन्या दोन-तीन वर्षे वॉरंटी देत आहेत, पुन्हा ग्राहकाला हवी असेल तर एक्स्टेंडेड वॉरंटी पैसे घेऊन उपलब्ध केली जात आहे. ही वॉरंटी पुढे ५ वर्षे घेते येत होती. परंतू, निस्सान या जपानी ऑटो कंपनीने या सर्वांवर कडी केली आहे. 

निस्सानने मॅग्नाईट या भारतीय बाजारात सध्या एकमेव असलेल्या कारवर १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी योजना जाहीर केली आहे. आधीच या कारवर कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. यावर आणखी ७ वर्षांची वॉरंटी पैसे घेऊन दिली जाणार आहे. निस्सानच्या या कारला नुकतीच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. 

 निस्सानच्या या एक्स्टेंडेट वॉरंटीसाठी प्रति किमी २२ पैसे किंवा प्रति दिन १२ रुपये याप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. शिवाय ही वॉरंटी १० वर्षे किंवा २ लाख किमी रनिंग यापैकी जे आधी होईल त्यावर लागू असणार आहे. काही ठिकाणी डीलर कंपनीची वॉरंटी संपली की आपल्या स्तरावर अशी वॉरंटी देत असतात. परंतू निस्सानची ही वॉरंटी देशभरातील सर्व अधिकृत सर्व्हिस सेंटरवर मिळणार आहे. यातून कार दुरुस्तीचा सर्व खर्च उचलला जाणार आहे. 

३+४, ३+३, ३+२ आणि ३+१ वर्षांचा पर्याय यात असणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या न्यू निस्सान मॅग्नाइटला ही वॉरंटी मिळणार आहे. ही वॉरंटी कार खरेदी करताना कर्जावर देखील घेता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. निस्सान भारत सोडून जाण्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरु होती, रेनॉल्टला आपला प्रकल्प विकला होता. यावर कंपनीने खुलासा केला होता. यातच आता १० वर्षांची वॉरंटी जाहीर करून कंपनीने भारत सोडून जात नसल्याची बाब पेरण्यास सुरुवात केली आहे.  

 

टॅग्स :Nissanनिस्सान