AI स्मार्ट फीचर्ससह लॉन्च झाली सर्वात स्वस्त 7-सीटर कार; किंमत फक्त ₹5.65 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 21:08 IST2026-02-17T21:07:36+5:302026-02-17T21:08:19+5:30

Nissan Gravite Launch: देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार; जाणून घ्या फीचर्स...

Nissan Gravite Launch: The cheapest 7-seater car launched with AI smart features; only ₹5.65 lakh | AI स्मार्ट फीचर्ससह लॉन्च झाली सर्वात स्वस्त 7-सीटर कार; किंमत फक्त ₹5.65 लाख...

AI स्मार्ट फीचर्ससह लॉन्च झाली सर्वात स्वस्त 7-सीटर कार; किंमत फक्त ₹5.65 लाख...

Nissan Gravite Launch: जपानी कार उत्पादक कंपनी Nissan ने दीर्घ काळानंतर भारतीय बाजारात आपली नवी 7-सीटर कार Nissan Gravite अधिकृतपणे लॉन्च केली आहे. उदयपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात या कारचे अनावरण करण्यात आले. आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमुळे Gravite कडे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.

किंमत आणि बुकिंग...

Nissan Gravite ची सुरुवातीची किंमत फक्त ₹5.65 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली असून, ही देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार ठरली आहे. निसान इंडियाने या कारसाठी अधिकृत बुकिंग सुरू केली असून, इच्छुक ग्राहक आज रात्रीपासून कंपनीच्या वेबसाइटवर किंवा अधिकृत डीलरशिपवरून बुकिंग करू शकतात. कंपनीने पहिल्या 5,000 युनिट्ससाठी स्पेशल इंट्रोडक्टरी प्राइस जाहीर केली आहे. म्हणजेच, लवकर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ही कार कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Renault Triberवर आधारित, पण वेगळी ओळख

Nissan Gravite ही मूळतः Renault Triber या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. मात्र, डिझाइन आणि फीचर्समध्ये केलेल्या बदलांमुळे ती वेगळी ओळख निर्माण करते. Gravite खास करून कुटुंबीय वापर आणि दैनंदिन गरजांवर लक्ष केंद्रित करून डिझाइन करण्यात आली आहे.

बाहेरील डिझाइन कसे आहे?

नवीन DRL सिग्नेचरसह हेडलॅम्प्स

हनीकॉम्ब पॅटर्न फ्रंट ग्रिल

नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स

C-शेप सिल्वर इंसर्टसह फ्रंट व रियर बंपर

बोनट आणि टेलगेटवर ‘GRAVITE’ ब्रँडिंग

कलर ऑप्शन: फॉरेस्ट ग्रीन, ओनिक्स ब्लॅक, ब्लेड सिल्व्हर, स्नो व्हाइट आणि मेटॅलिक ग्रे

केबिन आणि सीटिंग लेआउट

Gravite मध्ये 5+2 सीटिंग लेआउट देण्यात आले आहे. इंटीरियर Triberसारखाच असला तरी, कलर स्कीम आणि ट्रिम्स वेगळे ठेवण्यात आले आहेत.

फ्लॅट-बॉटम थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील

साधा पण युजर-फ्रेंडली डॅशबोर्ड

हायर व्हेरिएंट्समध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट

7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले

इतर फीचर्स...

Nissan Gravite मध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto

पुश बटन स्टार्ट/स्टॉप

क्रूझ कंट्रोल

ऑटोमॅटिक LED हेडलॅम्प्स

रेन सेन्सिंग वायपर्स

रियर AC व्हेंट्स

ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल

वायरलेस चार्जिंग

कूल्ड ग्लोव्हबॉक्स

रिव्हर्स कॅमेरा

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) असे फीचरर्स देण्यात आले आहेत.

लिमिटेड एडिशन, फक्त 1,001 युनिट्स

निसानने Gravite चा एक लिमिटेड ‘लॉन्च एडिशन’ देखील सादर केला आहे. याच्या फक्त 1,001 युनिट्स उपलब्ध असतील.

लॉन्च एडिशन फीचर्स

JBL साउंड सिस्टीम

ड्युअल-चॅनेल डॅशकॅम

अॅम्बियंट लाइटिंग

काही अतिरिक्त प्रीमियम फीचर्स

इंजिन, मायलेज अन् CNG व्हर्जन

Nissan Gravite मध्ये 1.0 लिटर, 3-सिलिंडर नॅचरल अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे 72 hp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स मिळेल. कारचे मायलेज मॅन्युअलमध्ये 19.3 किमी/लिटर, तर AMT: 19.6 किमी/लिटर आहे. 

Gravite एकूण 8 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे, निसानने लॉन्चवेळीच ड्युअल-सिलिंडर CNG किट आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे एमडी सौरभ वत्स यांनी सांगितले की, CNG व्हर्जन लवकरच बाजारात आणले जाईल. कंपनीनुसार, Gravite चा मेंटेनन्स खर्च फक्त 40 पैसे प्रति किमी इतका असून, तो सेगमेंटमधील सर्वात कमी आहे.

AI व्हॉईस असिस्टंट ‘Akira’

Nissan Gravite मध्ये इंडस्ट्रीतील पहिला AI व्हॉईस असिस्टंट देण्यात आला असून, त्याचे नाव ‘Akira’ ठेवण्यात आले आहे. हा फीचर व्हॉईस चॅटद्वारे वाहनाशी संवाद साधण्याची सुविधा देतो.

Web Title : निसान ने एआई फीचर्स के साथ किफायती 7-सीटर ग्रेविट लॉन्च की

Web Summary : निसान ने 5.65 लाख रुपये की शुरुआती कीमत पर ग्रेविट लॉन्च की, जो एक किफायती 7-सीटर कार है। इसमें एआई वॉयस असिस्टेंट 'अकीरा' है और यह रेनॉल्ट ट्राइबर प्लेटफॉर्म पर आधारित है, जो अद्वितीय डिजाइन और सुविधाएँ प्रदान करता है। बुकिंग शुरू हो गई है और शुरुआती कीमत पर विशेष छूट भी है।

Web Title : Nissan Launches Gravite: Affordable 7-Seater Car with AI Features

Web Summary : Nissan launched the Gravite, a budget-friendly 7-seater car, starting at ₹5.65 lakh. It boasts AI voice assistant, 'Akira', and is based on the Renault Triber platform, offering unique design elements and features. Bookings are now open with special introductory pricing.