वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:23 IST2026-04-09T15:22:08+5:302026-04-09T15:23:05+5:30

New Toll Rules April 2026: टोल नाक्यावर रोख रक्कम बंद! उद्यापासून लागू होणार नवीन नियम.

New Toll Rules April 2026: Vehicle owners...! From tomorrow, cash will not be accepted at toll booths! If you don't have FASTag, UPI, you won't be able to move forward... | वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...

वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...

देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १० एप्रिल २०२६ पासून टोल वसुलीच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार, आता टोल प्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे बंद केली जाणार असून डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे.

काय आहेत नवीन नियम?

उद्यापासून टोल नाक्यांवरील 'कॅश लेन' पूर्णपणे बंद केल्या जातील. जर एखाद्या वाहनधारकाकडे वैध फास्टॅग नसेल किंवा डिजिटल पेमेंटची सोय नसेल, तर त्याला टोल प्लाझावरून पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. नवीन नियमांनुसार, अनेक महामार्गांवर 'ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम' लागू केली जात आहे. यामुळे वाहन जेवढे अंतर कापेल, तेवढाच टोल कापला जाईल. टोल प्लाझावर थांबण्याची गरज आता उरणार नाही. जर एखाद्याने नियमांचे उल्लंघन करून टोल नाक्यावर गोंधळ घातला किंवा रोख रकमेचा आग्रह धरला, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच, अशा वाहनांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकारही प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

वाहनधारकांसाठी सूचना
प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स असल्याची खात्री करा. जर तुमच्या वाहनावर अजूनही फास्टॅग नसेल, तर तो आजच लावून घ्या, अन्यथा उद्यापासून तुम्हाला प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Web Title : टोल पर नकद नहीं: फास्टैग, यूपीआई अनिवार्य, वरना नो एंट्री!

Web Summary : कल से टोल प्लाजा पर नकद बंद! फास्टैग या यूपीआई जरूरी। ग्लोबल नेविगेशन सैटेलाइट सिस्टम से दूरी के अनुसार टोल लगेगा। उल्लंघन करने पर जुर्माना और ब्लैकलिस्टिंग। यात्रा में बाधा से बचने के लिए फास्टैग बैलेंस सुनिश्चित करें या आज ही प्राप्त करें।

Web Title : No Cash at Tolls: FASTag, UPI Mandatory or No Passage!

Web Summary : Toll plazas go cashless from tomorrow! FASTag or UPI is a must. Global Navigation Satellite System will calculate tolls based on distance. Violators face fines and blacklisting. Ensure sufficient FASTag balance or get one today to avoid travel disruptions.