new rule for vehicles retro reflective tape on number plate | आता वाहनांच्या नंबर प्लेटवर लावावी लागणार चमकदार टेप, अन्यथा आकारला जाणार दंड

आता वाहनांच्या नंबर प्लेटवर लावावी लागणार चमकदार टेप, अन्यथा आकारला जाणार दंड

नवी दिल्लीः रस्त्यावर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता केंद्र सरकार लवकरच मोठं पाऊल उचलू शकतं. प्रस्तावित नव्या नियमानुसार आता गाड्यांच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप(चमकदार टेप) लावणं अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता आहे. जर कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर चमकदार टेप लावलेली नसल्यास त्यावर दंड आकारलं जाणार आहे. रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी सरकारनं या निर्णयाची पुढील आठवड्यात अंमलबजावणी करणार असल्याची चर्चा आहे.

 नंबर प्लेट चमकल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांच्या ड्रायव्हरला पुढे गाडी असल्याचं समजतं. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहनांमध्ये चमकदार टेप लावण्यासाठी या आठवड्यात अधिसूचना जारी करू शकते. रेट्रोसंदर्भात मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांन सांगितलं की, सडक सुरक्षेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. 

काय आहे नियम?
नियमानुसार, ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षामध्ये पुढे सफेद रंग आणि पाठीमागे लाल रंगाची चमकदार टेप लावणं गरजेचं आहे. या टेपची रुंदी 20 मिमीहून कमी असू नये. जर गाडी 25 किमी प्रतितासाच्या वेगानं धावत असल्यास रेट्रोची चमकदार टेप 50 मीटर दूरवरूनच दिसली पाहिजे. पहिल्यांदा ई-रिक्षाला या नियमात सूट दिलेली आहे. आता रस्ते अपघातात ई-रिक्षांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारनं हा निर्णय घेतला आहे. रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 

Web Title: new rule for vehicles retro reflective tape on number plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.