Maruti Ertiga ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी 7-सीटर कार, Kia Carens चंही टेन्शन वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 03:51 PM2022-11-18T15:51:49+5:302022-11-18T15:53:12+5:30

या 7-सीटर MPV मध्ये इतरही काही स्टँडर्ड फीचर्स असू शकतात. एवढेच नाही, तर ही 6 आणि 7-सीट कॉन्फिगरेशनसह उपलब्ध केली जाऊ शकते.

New citroen 7 seater mpv car coming to compete with Maruti Ertiga Kia Carens will also increase tension | Maruti Ertiga ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी 7-सीटर कार, Kia Carens चंही टेन्शन वाढणार!

Maruti Ertiga ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी 7-सीटर कार, Kia Carens चंही टेन्शन वाढणार!

Next


भारतात फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी असलेल्या Citroen च्या पोर्टफोलियोमध्ये सध्या C3 हॅचबॅक आणि C5 एअरक्रॉस, असे दोन प्रोडक्ट आहेत. आता कंपनी C3 हॅचवर आधारलेले एक नव्या 7-सीटर मॉडेलसह कॉम्पॅक्ट MPV सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची योजना आखत आहे. याचे परीक्षण आधीच सुरूही झाले आहे. नवी सिट्रोएन 7-सीटर एमपीव्ही ही मारुती सुझुकी एर्टिगाला टक्कर म्हणूनही आणली जाऊ शकते. सध्या, या सेगमेंटमध्ये किआ कॅरेन्सलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. Citroen ची नवी एमपीव्ही या कारलाही टक्कर देईल.

नवी Citroen 7-सीटर MPV दिसायला C3 (विशेषतः पुढील आणि मागील प्रोफाइल) सारखी असू शकते. मात्र ही लांब असेल आणि यात अधिक केबिन स्पेस असेल. टेस्टिंगदरम्यान जे मॉडेल दिसून आले होते, त्यात C3 च्या 17-इंच व्हील ऐवजी 16-इंचाचे व्हील दिसून आले होते. मॉडेलच्या बॉडीच्या चारही बाजूंनी प्लास्टिक बॉडी क्लॅडिंग, मोठा ग्लास एरिया आणि लांब रिअर ओव्हरहँग मिळण्याची शक्यता आहे. या कारचा ग्राउंड क्लिअरन्सदेखील अधिक असेल.

नवी सिट्रोएन एमपीव्ही सी-3 हॅचबॅककडून घेण्यात आलेले स्टेलेंटिसच्या सीएमपीवर (कॉमन मॉड्यूलर प्लेटफॉर्म) डिझाइन केले जाईल. मात्र, कंपनी 4 मीटरहून अधिक लांब असलेल्या मॉडेलसाठी आपल्या आर्किटेक्चरमध्ये बदल करू शकते. इंटीरियर लेआउट आणि फीचर्स C3 हॅच सारखे असण्याची शक्यता आहे. हिचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, इंस्ट्रूमेंट क्लस्टर, डॅशबोर्ड डिझाइन, सेंटर कंसोल आणि स्टिअरिंग व्हीलही सी3 प्रमाणेच असू शकते.

या 7-सीटर MPV मध्ये इतरही काही स्टँडर्ड फीचर्स असू शकतात. एवढेच नाही, तर ही 6 आणि 7-सीट कॉन्फिगरेशनसह उपलब्ध केली जाऊ शकते. हिचे 6-सीटर व्हर्जन मिडल रोमध्ये कॅप्टन सिट्ससह येईल. नवी Citroen 7-सीटर MPV मध्ये 1.2L, 3-सिलेंडर, नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.2L, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते.
 

Web Title: New citroen 7 seater mpv car coming to compete with Maruti Ertiga Kia Carens will also increase tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.