शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

न पाहिले कधी! स्कूटरलाही आला रिव्हर्स गिअर; पियाजिओची करामत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 8:32 AM

कंपनीने सध्या या स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही, परंतू ही स्कूटर बजाज, हिरोच्या स्कूटरना टक्कर देणारी असून तीची किंमत 1 ते 1.25 लाखांच्या आसपास असण्य़ाची शक्य़ता आहे. 

ठळक मुद्देया स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी देण्यात आली असून व्हेस्पाच्या मोबाईल अॅपद्वारे कनेक्ट करता येणार आहे.सीटच्या खाली मोठी स्टोरेज स्पेस देण्यात आलेली असून ज्यामध्ये हेल्मेटही ठेवता येते. बॅटरी रिचार्ज करण्यासाठी केबलही मिळते.

दिल्ली : इटलीच्या पियाजिओ ग्रुपने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर व्हेस्पा लाँच केली आहे. ऑटो एक्सपो 2020 मध्ये ही स्कूटर शोकेस करण्यात आली. या स्कूटरची खास बाब अशी की रिव्हर्स गिअर देण्य़ात आलेला आहे. ही या फिचरची भारतातील पहिलीच स्कूटर आहे. 

कंपनीने सध्या या स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही, परंतू ही स्कूटर बजाज, हिरोच्या स्कूटरना टक्कर देणारी असून तीची किंमत 1 ते 1.25 लाखांच्या आसपास असण्य़ाची शक्य़ता आहे. सीईओ डियागो ग्राफी यांनी सांगितले की भारतात इलेक्ट्रीक स्कूटरची वाढती बाजारपेठ पाहता या स्कूटरला खासकरून भारतासाठी तयार करण्यात आले आहे. ही स्कूटर 5 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. 

यामध्ये 4kW ब्रशलेस डीसी मोटार लावण्यात आली आहे. ही मोटर 5.4 बीएचपी ताकद आणि 200 एनएम टॉर्क तयार करते. यामध्ये 4.2 kWh ची लिथिअम आयनची बॅटरी देण्यात आली असून इको मोडवर ही स्कूटर 100 किमी पर्यंत धावू शकते. तर पावर मोडवर 70 किमी एवढे अंतर कापते. पावर मोडवर ही स्कूटर ताशी 70 किमी आणि इको मोडवर ताशी 45 किमी वेगाने धावू शकते. 

या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी देण्यात आली असून व्हेस्पाच्या मोबाईल अॅपद्वारे कनेक्ट करता येणार आहे. यामध्ये 4.3 इंचाची फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे जो टीएफटी डिस्प्लेचा आहे. सीटच्या खाली मोठी स्टोरेज स्पेस देण्यात आलेली असून ज्यामध्ये हेल्मेटही ठेवता येते. याशिवाय़ बॅटरी रिचार्ज करण्यासाठी केबलही मिळते. या केबलद्वारे घरी किंवा बाहेर स्कूटर चार्ज केली जाऊ शकते. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनAutomobileवाहन