शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

२१ कोटींची सुपरकार असलेला एकमेव भारतीय; पाहा काय खास आहे बुगाटी चिरॉन लक्झरीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:59 PM

अमेरिकेत राहणाऱ्या मयूर श्री नावाच्या भारतीयाकडे बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) आहे.

परदेशात राहणार्‍या भारतीयांना लक्झरी कारची खूप आवड असते. तुम्ही अशा अनेक भारतीयांबद्दल वाचले किंवा ऐकले असेल, जे परदेशात राहतात आणि त्यांच्याकडे महागड्या कार आहेत. शेकडो भारतीय आहेत ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आणि रेंज रोव्हरसह जगभरातील कार कंपन्यांच्या लाखो कार आहेत. असाच एका एनआरआयकडे आलिशान बुगाटी कार आहे, या कारची किंमत अंदाजे 21 कोटी रुपये आहे. 

अमेरिकेत राहणाऱ्या मयूर श्री नावाच्या भारतीयाकडे बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) आहे. मयूर श्री हे बुगाटी चिरॉनचे मालक असलेले जगातील एकमेव भारतीय आहेत. त्यांच्याशिवाय संपूर्ण जगात बुगाटी चिरॉनचा मालक असलेला दुसरा भारतीय नाही. मयूर श्री यांनी काही वर्षांपूर्वी चिरॉन खरेदी केली होती. चिरॉनसाठी त्यांनी नेमकी किती किंमत मोजली, हे माहित नाही. परंतु कारसाठी जवळपास 21 कोटी रुपये दिले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

मयूर श्री हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथील  टेक्सासमध्ये कार्यरत आहे. मयूर यांच्या गॅरेजमध्ये असलेली बुगाटी चिरॉन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. बुगाटी चिरॉनमध्ये 8.0-लीटर, क्वाड-टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे, जे 1,479 बीएचपी आणि 1,600 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. कारच्या चारही चाकांना पॉवर सप्लाय देण्यासाठी त्यात हालडॅक्स ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टिम देण्यात आली आहे. 

जगात बुगाटी चिरॉनचे फक्त 100 युनिट्स आहेत. ही कार रस्त्यावर फार दुर्मिळ दिसते. ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. तो इतका वेगवान आहे की, कारचा सर्वोच्च वेग सामान्य रस्त्यावरही गाठता येणार नाही. बुगाटी चिरॉनचा सर्वोच्च वेग 420 किमी प्रतितास आहे. ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 2.5 सेकंद घेते. या सुपरकारचा लूक आणि फीचर्स असे आहेत की, ती पाहून कोणीही आवडेल.

टॅग्स :carकारBugattiबुगाटीAutomobileवाहनAmericaअमेरिका