भविष्यातील वाहतूक मानल्या जाणाऱ्या 'सेल्फ-ड्राइव्हिंग' तंत्रज्ञानाला चीनमध्ये मोठा धक्का बसला आहे. चीनमधील वुहान शहरात बुधवारी एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे 'बायडू' कंपनीच्या १०० हून अधिक 'अपोलो गो' रोबोटॅक्सी भररस्त्यात अचानक थांबल्या. या प्रकारामुळे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ च्या सुमारास अचानक १०० हून अधिक विनाचालक टॅक्सी रस्त्यांच्या मधोमध थांबल्या. अनेक गाड्या रिंग रोड आणि हायवेच्या मधल्या लेनमध्ये बंद पडल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. बाजूने वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक प्रवासी घाबरून गाडीतून खाली उतरले नाहीत.
एका प्रवाशाने सांगितले की, वळण घेत असताना अचानक टॅक्सी थांबली आणि स्क्रीनवर "ड्रायव्हिंग सिस्टममध्ये बिघाड झाला असून स्टाफ ५ मिनिटांत पोहोचेल" असा संदेश आला. मात्र, बराच वेळ कोणीही मदतीला आले नाही. अखेर काहींनी 'SOS' बटण दाबून मदतीची मागणी केली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सुरक्षेवर प्रश्नचिन्हचीनमधील दिग्गज टेक कंपनी 'बायडू' या टॅक्सी चालवते. जगभरात या तंत्रज्ञानाचा विस्तार केला जात असताना वुहानमधील या 'सिस्टम फेलियर'मुळे सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही 'वेमो' (Waymo) कंपनीच्या गाड्यांबाबत असाच प्रकार घडला होता. या घटनेमुळे आता चालकविरहित गाड्या किती सुरक्षित आहेत, याबाबत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Over 100 Baidu robotaxis in Wuhan, China, malfunctioned, causing traffic chaos and passenger fear. A system failure left driverless cars stranded, triggering safety concerns about self-driving technology after similar incidents in the US. Passengers were trapped inside vehicles awaiting rescue.
Web Summary : चीन के वुहान में 100 से अधिक बायडू रोबोटैक्सियाँ खराब हो गईं, जिससे यातायात बाधित हुआ और यात्रियों में डर फैल गया। सिस्टम फेल होने से ड्राइवरलेस कारें फँस गईं, जिससे अमेरिका में इसी तरह की घटनाओं के बाद सेल्फ-ड्राइविंग तकनीक की सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ गईं। यात्री बचाव का इंतजार करते हुए वाहनों के अंदर फंस गए।