MINI कारने भारतीय बाजारपेठेत उडवली खळबळ; एकदा चार्ज केल्यानंतर धावेल 270 किमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:01 IST2022-02-24T17:56:19+5:302022-02-24T18:01:43+5:30
Electric Cooper SE : कंपनी मार्चपासून ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना सुपूर्द करण्यास सुरुवात करेल आणि या कारच्या पुढील बॅचसाठी बुकिंगही सुरू करण्यात येणार आहे.

MINI कारने भारतीय बाजारपेठेत उडवली खळबळ; एकदा चार्ज केल्यानंतर धावेल 270 किमी
नवी दिल्ली : MINI ने भारतात पूर्णपणे इलेक्ट्रिक Cooper SE लाँच केली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत रु. 47.20 लाख आहे. ही कार संपूर्णपणे देशात विकली जात आहे आणि ही ईव्ही केवळ फुल लोडेड व्हेरिएंटमध्ये भारतात आणली गेली आहे. कंपनीने मार्केटमध्ये विक्रीसाठी फक्त 30 युनिट्सचे वाटप केले होते आणि बुकिंग सुरू होताच, सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनी मार्चपासून ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना सुपूर्द करण्यास सुरुवात करेल आणि या कारच्या पुढील बॅचसाठी बुकिंगही सुरू करण्यात येणार आहे.
MINI ने ऑल-इलेक्ट्रिक कूपर राउंड एलईडी हेडलॅम्प, युनियन जॅक थीम एलईडी टेललाइट्स आणि चांगली डिझाइन केली आहे. इलेक्ट्रिक असल्याने, कारला एक मोठी साइड ब्लँक-आउट ग्रिल, बदल केलेला फ्रंट बंपर, दुसऱ्या डिझाइनचा बॅक बंपर आणि मिरर तसेच व्हील्सवर चमकदार पिवळे एक्सेंट दिले आहे. अधिक चांगल्या लूकसाठी सोबत आकर्षक 17-इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कूपर एसईला इंधनावर चालणाऱ्या कारच्या तुलनेत चांगले ग्राउंड क्लिअरन्स आहे. कंपनीने ही कार व्हाईट सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक, मूनवॉक ग्रे आणि ब्रिटिश रेसिंग ग्रीन या चार रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.
कूपर एसईचे फीचर्स जवळजवळ सँडर्ड मिनी कूपर सारखीच आहेत, ज्यात 5.5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे. फरक फक्त मध्य कन्सोलवर टॉगल स्विच आहे. मिनीचा दावा आहे की नवीन पॉवरट्रेनमुळे त्याच्या बूटस्पेसमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कूपर एसईला Apple CarPlay आणि Android Auto सह 8.8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्पोर्ट्स सीट हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, नप्पा लेदर स्टीयरिंग व्हील आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.
एका चार्जमध्ये किती धावते
कूपर एसईमध्ये 32.6 kW-R बॅटरी पॅक आहे, जी 184 बीएचपी आणि 270 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ती कारचा वेग 0-100 किमी/ताशी 7.3 सेकंदात वाढवते, तर तिचा टॉप स्पीड 150 किमी/ताशी आहे. कारला मिड, स्पोर्ट, ग्रीन आणि ग्रीन प्लस असे चार ड्राइव्ह मोड देण्यात आले आहेत. एका चार्जवर, ही कार 270 किमी पर्यंत चालवता येते, तर फास्ट चार्जरच्या मदतीने, ही ईव्ही कार केवळ 36 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होते. सामान्य चार्जरने ती सुमारे अडीच तासांत 0-80 टक्के चार्ज होते, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी साडेतीन तास लागतात.