MG ZS EV: Price Announcement; In a five-day period it increased by one million | MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली
MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली

ठळक मुद्देएमजीने भारतातील पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही डिसेंबरमध्ये दाखविली होती. ग्राहकांना बुधवारपासूनच कार डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे

नवी दिल्ली : मुंबई : ब्रिटीश कंपनी मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजीने सहा महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले होते. भारतातील पहिली इंटरनेट कार लाँच केल्याने वाहन क्षेत्रात खळबळ उडाली होती. मंदीचा काळ असतानाही एमजीच्या हेक्टर एसयुव्हीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. तर आज एमजीने या एसयुव्हीच्या किंमतींची घोषणा केली आहे. 


एमजीने भारतातील पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही डिसेंबरमध्ये दाखविली होती. MG ZS EV असे या कारचे नाव असून जानेवारीमध्ये या कारच्या किंमती जाहीर केल्या जाणार होत्या. ही कार ह्युंदाईच्या कोनाला टक्कर देणार आहे. महत्वाचे म्हणजे या कारची एकदा चार्ज केल्याची रेंज 340 किमी असणार आहे. अखेर आज एमजीने किंमत जाहीर केली. 


काही दिवसांपूर्वीच एमजीने बुकिंग सुरू केले होते. किंमती जाहीर करण्याआधी बुकिंग बंद केले. 27 दिवसांत 2800 बुकिंग मिळाल्या आहेत. या काळात बुक केलेल्या कार ग्राहकांना 1 लाख रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत. तसेच या ग्राहकांना बुधवारपासूनच कार डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे एमजीच त्यांना फास्ट चार्जर बसवून देत आहे. 


एमजीची किंमत 17 जानेवारीला 19,88,000 रुपये आणि 22,58,000 एवढी ठेवण्यात आली होती. त्यानंतर आज ही किंमत 1 लाख रुपयांनी वाढवून 20.88 लाख आणि 23.58 लाख करण्यात आली आहे. यामुळे आधी बुकिंग केलेल्या ग्राहकांना 1 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. 

गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला

MG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा

Web Title: MG ZS EV: Price Announcement; In a five-day period it increased by one million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.