एमजी मॅजेस्टर एसयूव्ही लाँच, मेपासून डिलिव्हरी; मसाज सीट, ३६० डिग्री कॅमेरा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:44 IST2026-02-13T09:44:00+5:302026-02-13T09:44:21+5:30

एमजी मॅजेस्टर एसयूव्ही खडकाळ, वाळवंट, चिखल आणि बर्फाळ अशा कोणत्याही प्रकारच्या वातावरणात चालविण्यासाठी उपयुक्त आहे.

MG Majestor SUV launches, deliveries from May; What is Featured | एमजी मॅजेस्टर एसयूव्ही लाँच, मेपासून डिलिव्हरी; मसाज सीट, ३६० डिग्री कॅमेरा अन्...

एमजी मॅजेस्टर एसयूव्ही लाँच, मेपासून डिलिव्हरी; मसाज सीट, ३६० डिग्री कॅमेरा अन्...

नवी दिल्ली : एमजी मोटर इंडियाने अत्याधुनिक अन् तेवढीच आरामदायक अशी एमजी मॅजेस्टर प्रीमियम एसयूव्ही गाडी गुरुवारी लाँच केली. गाडीचे प्री-बुकिंग सुरू झाले असून मे महिन्यापासून ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाणार आहे.

एमजी मोटरचे प्रबंध संचालक अनुराग महरोत्रा, विनित रैना आणि उदित मलहोत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, एमजी मॅजेस्टर ही एका कुटुंबाची फॅमिली ट्रिपपासून ते ॲडव्हेंचरस ट्रिपपर्यंतच्या सर्व प्रवासाच्या गरजा पूर्ण करणारी आरामदायक अशी गाडी आहे. या एसयूव्हीला सिंगल गाडी मल्टिपल सोल्युशन म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. एमजी मॅजेस्टर एसयूव्ही खडकाळ, वाळवंट, चिखल आणि बर्फाळ अशा कोणत्याही प्रकारच्या वातावरणात चालविण्यासाठी उपयुक्त आहे. ड्रायव्हरच्या सहकार्याशिवाय कोणत्याही परिस्थितीतून सहज बाहेर निघू शकेल अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. 

गाडीमध्ये आहे मसाज सीट
ही एसयूव्ही तीन श्रेण्यांत उपलब्ध होणार आहे. यात सहा आणि सात आसनी गाडीचा समावेश आहे. मसाज सीट आहे आणि पाय लांब करण्यासाठी बरीच मोठी जागा मिळणार आहे. मे महिन्यापासून गाडीची किल्ली ग्राहकांच्या हातात दिली जाणार आहे. ग्राहकांना पाच वर्षांची वॉरंटी, मोफत सेवा आणि रोडसाइड असिस्टन्स दिले जाणार आहे.

३६० डिग्री कॅमेरा अन्...
गाडीत १२.३ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा, जेबीएल ऑडिओ सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आहे. परिस्थितीनुसार कोणत्या चाकावर जास्त भर द्यायचा, याचा निर्णय गाडी स्वत: घेऊ शकते. एका कुटुंबाला गाडी आकाराने मोठी, सुखसोयींनी युक्त आणि खिशाला परवडणारी अशी हवी असते. मॅजेस्टर एसयूव्ही या सर्व गरजा पूर्ण करते, असा दावाही महरोत्रा यांनी केला.

Web Title : एमजी मोटर ने मसाज सीट, 360 कैमरे के साथ मेजेस्टर एसयूवी लॉन्च की

Web Summary : एमजी मोटर इंडिया ने मेजेस्टर एसयूवी लॉन्च की, जिसमें मसाज सीट, 360-डिग्री कैमरा और आधुनिक तकनीक है। प्री-बुकिंग शुरू हो गई है, और डिलीवरी मई में शुरू होगी। यह विभिन्न इलाकों और परिवार की जरूरतों के लिए उपयुक्त है, जिसमें 12.3 इंच का इंफोटेनमेंट सिस्टम और पैनोरमिक सनरूफ है। पांच साल की वारंटी शामिल है।

Web Title : MG Motor Launches Majester SUV with Massage Seats, 360 Camera

Web Summary : MG Motor India launched the Majester SUV, offering massage seats, a 360-degree camera, and advanced technology. Pre-booking is open, with deliveries starting in May. It suits various terrains and family needs, featuring a 12.3-inch infotainment system and panoramic sunroof. Five-year warranty included.

टॅग्स :Automobileवाहन