शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Mercedes नं भारतात लाँच केली नवी E-Class कार; ७ सेकंदात १०० किलोमीटरचा वेग, पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:33 PM

Mercedes Benz E Class : पाहा किती आहे किंमत आणि काय आहे विशेष

ठळक मुद्देवाढती मागणी पाहता कंपनीनं भारतात लवकर लाँच केली ही कार तब्बल 7.6 सेकंदात कार पकडते 100 किमी प्रति तासाचा वेग

Mercedes-Benz नं आपली लक्झरी सेडान E-Class चं फेसलिफ्ट व्हेरिअंट भारतात लाँच केलं आहे. नवी कार सध्याच्या कारच्या तुलनेत निराळी आहे. या कारमध्ये फ्रन्टला नवी ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय यासोबत फ्रन्ट बम्पर आणि अलॉय व्हिल्सही देण्यात आले आहेत. E-Class मध्ये 2 लिटरचे चाक सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. ते 194bhp पॉवर आमि 320nm चा टॉर्क जनरेट करते. तसंच कंपनीनं ही कार दोन डिझेल व्हेरिअंटमध्ये लाँच केली आगे. ही कार या वर्षाच्या अखेरिस लाँच करण्याचा कंपनीचा मानस होता. परंतु E-Class ची वाढती डिमांड पाहता कंपनीनं ही कार वेळेपूर्वी लाँच केली आहे. ही कार पाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात E200 Expression व्हेरिअंटची किंमत 63.6 लाख रूपये,  E200 Exclusive ची किंमत 67.2 लाख रूपये, E220d Expression ची किंमत 64.8 लाख रूपये आणि E220d Exclusive ची किंमत 68.3 लाख रूपये आणि सर्वात महागड्या E350d व्हेरिएंटच्या कारची कीमत 80.9 लाख रूपये है. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत. नवी Mercedes-Benz E-Class ही 2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल या पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे. पेट्रोल इंजिन 197 hp ची पॉवर आणि 320 Nm चा टॉर्क जेनरेट करतं. तर डिझेल पावरट्रेन 194hp ची पॉवर आणि 400Nm चं टॉर्क जनरेट करतं. नवी Mercedes-Benz E-Class ही LWB फॉर्ममध्ये सादर करणं कायम ठेवलं आहे. कारचं डिझाईन आणि लूकमध्येही काही बदल पाहायला मिळत आहे. कारचा फ्रन्ट लूक हा यापूर्वीच्या तुनेत अधिक स्पोर्टी आहे. यासोबतच कारचा रिअर लूकही अधिक आकर्षक करण्यात आला आहे. कारमध्ये स्पोर्टिअर एक्सटिरिअर डिझाईन आणि अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहे. तसंच यात नवे अॅडाप्टिव्ह एलईडी हेडलँप्स आणि एलईडी टेललँप्स देण्यात आले आहेत. E200 आणि E220 D ही कार तब्बल 7.6 सेकंदात 100 किमी प्रति तास तर 350D ही कार 6.1 सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे.

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झIndiaभारतcarकार