शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 3:29 PM

Maruti CNG Car: सध्यातरी मारुती आणि ह्युंदाईकडे सीएनजीचे पर्याय आहेत. टाटा, फोर्ड या कंपन्या लवकरच सीएनजी कार बाजारात आणतील. परंतू मारुतीचा हात या कंपन्या मिळूनही पकडू शकणार नाहीत. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी कहर मांडला आहे. यामुळे ग्राहक पर्यायी इंधनाकडे मोठ्या प्रमाणावर वळू लागले आहेत. यामुळे लोकांचा ओढा सीएनजी आणि ईलेक्ट्रीक वाहनांकडे वाढू लागला आहे. यामुळे देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या ताफ्यातील सर्वच गाड्या सीएनजी (CNG) करण्याच्या विचारात आहे. जोवर इलेक्ट्रीक वाहने मुख्य प्रवाहात येत नाहीत तोवर सीएनजी हाच एक पर्याय राहणार आहे. (Maruti suzuki will launch two CNG cars soon.)

यामुळे मारुती लवकरच दोन नव्या कार सीएनजीमध्ये उतरवणार आहे. सध्यातरी मारुती आणि ह्युंदाईकडे सीएनजीचे पर्याय आहेत. टाटा, फोर्ड या कंपन्या लवकरच सीएनजी कार बाजारात आणतील. परंतू मारुतीचा हात या कंपन्या मिळूनही पकडू शकणार नाहीत. मारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत. यापैकी काही कार सीएनजीमध्ये आहेत. आता आणखी दोन कारची त्यामध्ये भर पडणार आहे. 

Maruti Suzuki Swift CNG मध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire CNG) देखील सीएनजीमध्ये लाँच केली जाणार आहे. दोन्ही कार टेस्टिंगवेळी दिसल्या आहेत. या दोन्ही गाड्या सीएनजीमध्ये लाँच झाल्यावर मारुतीकडे एकूण 8 सीएनजी कार असणार आहेत. एक अर्टिगा सोडली तर अन्य गाड्या या 30 ते 32 किमी प्रति किलोचे मायलेज देतात.  

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीPetrolपेट्रोल