मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:17 IST2025-06-17T15:16:49+5:302025-06-17T15:17:17+5:30
Maruti's first e Vitara : मारुतीची ई-व्हिटारा ही पहिली इलेक्ट्रीक कार युकेमध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतात ही कार सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रीक वाहनाची गेली कित्येक वर्षांपासून भारतीयच नाही तर जगभरातून ग्राहक वाट पाहत आहेत. अखेर मारुतीची बहुप्रतिक्षित असलेली SUV Maruti e Vitara जागतिक बाजारात लाँच झाली आहे. या कारचे उत्पादन भारतातच केले जाणार आहे. परंतू, तिची जगासाठीची किंमत पाहून भारतीयांचे डोळे पांढरे होणार आहेत.
मारुतीची ई-व्हिटारा ही पहिली इलेक्ट्रीक कार युकेमध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतात ही कार सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. युकेमध्ये या ई व्हिटाराची किंमत £२९,९९९ ते £३७,७९९ म्हणजेच भारतीय किंमतीत ते ३५.०५ लाख ते रु. ४४.१६ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आता भारतात या कारची किंमत किती असेल हे थोड्याच महिन्यांत समजणार आहे.
या कारमध्ये फिचर्सबाबत बोलायचे झाले तर समोर एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, वाय-आकाराचे एलईडी डीआरएल आणि पुढच्या बंपरवर जाड स्किड प्लेट देण्यात आली आहे. १८-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि बॉडी क्लॅडिंग तसेच वाय-आकाराचे एलईडी टेल-लॅम्प देण्यात आले आहेत. आतमध्ये १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, १०.१-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, इन्फिनिटी साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, १०-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फिक्स्ड ग्लास रूफ, PM2.5 केबिन एअर फिल्टर आणि अॅम्बियंट लाइटिंग आदी देण्यात आले आहेत.
७ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स सह भारतातील ही पहिलीच मारुतीची ADAS असलेली कार असणार आहे. भारतात आता या किंमती आवाक्यात ठेवण्यासाठी काय काय कमी केले जाते, किती कॉस्ट कटिंग केले जाते, हे सप्टेंबरमध्येच समजणार आहे.
बॅटरी...
मारुती ई विटारा ४९ किलोवॅट आणि ६१ किलोवॅट अशा दोन प्रकारच्या बॅटरी देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बॅटरी पॅकची रेंज अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतू ती ५०० किमीपेक्षा जास्त असेल असे सांगितले जात आहे. परंतू, भारतात मात्र या बॅटरी पॅकमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.