गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:58 IST2025-10-20T09:57:27+5:302025-10-20T09:58:11+5:30
Maruti Victoris Price Hike: गेल्या महिन्यातच नवरात्रीच्या मुहूर्तावर कंपनीने ही कार लाँच केली होती. आता महिना होत नाही तोच कंपनीने कारच्या किंमती वाढविल्या आहेत.

गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने नुकत्याच लाँच केलेल्या Maruti Victoris (मारुती विक्टोरिस) मिड-साईज एसयूव्हीच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर २०२५ पासून ही दरवाढ लागू झाली असून, यामुळे ठराविक उच्च श्रेणीतील मॉडेल्स महाग झाले आहेत.
कंपनीने विक्टोरिस एसयूव्हीच्या दोन टॉप वेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किमतीत ₹ १५,४०० इतकी वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच नवरात्रीच्या मुहूर्तावर कंपनीने ही कार लाँच केली होती. आता महिना होत नाही तोच कंपनीने कारच्या किंमती वाढविल्या आहेत.
या वेरिएंट्सच्या किमती वाढल्या:
ZXI+ (O) मॅन्युअल (Manual) वेरिएंट: किमतीत ₹ १५,४०० ची वाढ.
ZXI+ (O) ऑटोमॅटिक (AT) वेरिएंट: किमतीत ₹ १५,४०० ची वाढ.
इतर वेरिएंट्सच्या किंमतीचे काय...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती विक्टोरिसच्या बेस वेरिएंट्ससह इतर कोणत्याही वेरिएंट्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Victoris ची बेस एक्स-शोरूम किंमत अजूनही ₹ १०.५० लाख पासून सुरू होते.
मारुतीने काही महिन्यांपूर्वीच मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये विक्टोरिस लाँच केली होती. या कारला बाजारात Hyundai Creta, Kia Seltos, MG Hector आणि Tata Harrier सारख्या मजबूत प्रतिस्पर्धकांकडून टक्कर मिळत आहे. ग्राहकांना विक्टोरिस मध्ये LED हेडलाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ३५+ कनेक्टेड फीचर्स आणि ५-स्टार सुरक्षा रेटिंग यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात.