शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

SUV मध्ये बसून घ्या बलेनोचा फील, मारुतीनं सादर केली Fronx; 6 एअरबॅग्ससह दिले आहेत खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 15:02 IST

ग्राहक ही कार मारुती सुझुकी नेक्साच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून केवळ 11,000 रुपयांत बुक करू शकतात.

ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सुझुकीने 5-डोअर एसयूव्ही जिम्नी शिवाय आणखी एक कार सादर केली आहे. मारुती सुझुकीने गुरुवारी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली मोस्ट डिमांडिंग कार बलेनोवर बेस्ड स्पोर्टी कॉम्पॅक्ट एसयूव्ही फ्राँक्सचे अनावरण केले आहे. ही कार, ज्या ग्राहकांन हॅचबॅक कारपेक्षा वरच्या सेगमेंटची कार घ्यायची इच्छा आहे, अशा ग्राहकांना आकर्षित करेल. महत्वाचे म्हणज, कंपनीने या कराचे बुकिंगदेखील सुरू केले आहे. ग्राहक ही कार मारुती सुझुकी नेक्साच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून केवळ 11,000 रुपयांत बुक करू शकतात.

कारसोबत देण्यात आले आहेत जबरदस्त फीचर्स - Maruti Suzuki Fronx मध्ये एक स्पोर्टी आणि एअरोडायनामिक सिल्हूट आहे, जो हिला एक मस्कुलर स्टान्स देतो. याच बरोबर NEXWave ग्रिल, क्रिस्टल ब्लॉक LED DRLs आणि एक प्रोग्रेसिव्ह रूफलाइनही देण्यात आले आहे. यात आपल्याला उत्कृष्ट अलॉय व्हील देखील बघायला मिळेल. या कारमध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा, हेडअप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, पॅडल सिफ्टर, 9-इंच एचडी स्मार्ट प्ले प्रो+ इंफोटेनमेंट सिस्टिम, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम, वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हिटी बघायला मिळते.

इंजिन स्पेसिफिकेशन -फ्राँक्सच्या इंजिन स्पेसिफिकेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये आपल्याला दोन इंजिन ऑप्शन बघायला मिळतील. यात एक 1.0-लिटर K-सीरीज टर्बो बुस्टरजेट इंजिन बघायला मिळेल. यात प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञान, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि पॅडल शिफ्टर्स सह 6-स्पीड ऑटोमॅटिकचा पर्यायासह येईल. यात दुसरे अॅडव्हॉन्स 1.2L के-सीरीज डुअल जेट, डुअल VVT इंजिन बघायला मिळेल. हे आइडल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह येते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि AGS ट्रांसमिशन ऑप्शनसह उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी फ्राँक्स सेफ्टी फीचर्स -सेफ्टीसंदर्भात बोलायचे झाल्यास, Maruti Suzuki Fronx  Suzuki च्या सिग्निचर HEARTECT प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. जे एक बळकट बॉडी स्ट्रक्चरसाठी हाय टेंसाइल आणि अल्ट्रा-हाय टेंसाइल स्टीलचा वापर करते. या कारला 6 एअरबॅग, थ्री-लाईन ईएलआर सीटबेल्ट, ईएसपीसह हिल होल्ड असिस्ट आणि रोल ओव्हर मिटिगेशन, एबीएससह ईबीडीसारखे सेफ्टी फीचर्सदेखील देण्यात आले आहेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीauto expoऑटो एक्स्पो 2023Automobileवाहन