मारुती सुझुकीची नवी वॅगनआर लाँच होणार; मायलेजसोबत किंमतही वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:17 IST2023-03-28T13:14:44+5:302023-03-28T13:17:05+5:30
नवीन वॅगन आर एकूण चार प्रकारांमध्ये LXI, VXI, ZXI आणि ZXI Plus सादर केली जाईल. तसेच सीएनजी दोन व्हेरिअंटमध्ये मिळेल.

मारुती सुझुकीची नवी वॅगनआर लाँच होणार; मायलेजसोबत किंमतही वाढणार
मारुती सुझुकी सर्वात लोकप्रिय कारपैकी एक वॅगन आर नव्या ढंगात लाँच करणार आहे. लाँचपूर्वीच या कारची डिटेल्स लीक झाली आहेत. बीएस ६ दुसरा टप्पा लागू होणार असल्याने कार कंपन्यांना त्यांच्या जुन्या मॉडेलमध्ये अपडेट करण्याची संधी मिळाली आहे. याचबरोबर किंमतीत वाढ देखील होणार असून मायलेजही वाढण्याची शक्यता आहे.
पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट...
मारुती सुझुकी वॅगन आर कार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाँच करणार आहे. या कारला दोन नवीन इंजिन मिळणार आहेत. 1.0 लीटर आणि 1.2 लीटरमध्ये ही इंजिन असतील. टाटाच्या कारचे मायलेज वाढले आहे, यामुळे आता मारुतीच्या कारचीही मायलेज वाढणार आहे. मायलेज आणि किंमतीची माहिती लाँच वेळीच मिळणार आहे.
नवीन वॅगन आर एकूण चार प्रकारांमध्ये LXI, VXI, ZXI आणि ZXI Plus सादर केली जाईल. तसेच सीएनजी दोन व्हेरिअंटमध्ये मिळेल. या कारमध्ये स्टार्ट स्टॉप सिस्टीम दिली जाऊ शकते, जी ट्रॅफिकमध्ये कार आयडिअल असेल तर कार आपोआप चालू बंद होईल. यामुळे देखील मायलेज वाढेल.
या कारमध्ये केवळ इंजिन अपडेटच मिळेल. अन्य कोणतेही बदल होणार नाहीत. मारुती वॅगन आरचे सध्याचे मॉडेल मायलेजसाठी ओळखले जाते. 1.0 लिटर इंजिन सुमारे 23 किलोमीटरचे मायलेज देते आणि 1.2 लिटर इंजिन व्हेरिएंट प्रति लिटर 24 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. सीएनजीवर ही कार 34.05 किलोमीटर प्रति किलोचे मायलेज देते. या मायलेजमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन अपडेटनंतर, कंपनी त्याची किंमत थोडी वाढवू शकते, सध्याच्या मॉडेलची किंमत 5.53 लाख ते 7.41 लाख रुपये आहे.