मारुती सुझुकी 2020पासून डिझेल कारची विक्री बंद करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 18:37 IST2019-04-25T18:33:33+5:302019-04-25T18:37:19+5:30
भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. एप्रिल 2020 पासून कंपनीने भारतातील डिझेल गाड्यांचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

मारुती सुझुकी 2020पासून डिझेल कारची विक्री बंद करणार
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. एप्रिल 2020 पासून कंपनीने भारतातील डिझेल गाड्यांचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएसआयचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, '1 एप्रिल 2020 नंतर आम्ही डिझेल कारची विक्री करणार नाही.' सध्या एमएसआर कंपनी डिझेलवर चालणाऱ्या अनेक गाड्यांच्या मॉडेलची विक्री करत आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या डिझेल गाड्यातून कंपनीला दरवर्षी 23% नफा झाला आहे.
दरम्यान, डिझेल्या गाड्या बंद करण्यात येणार आहे, अशी घोषणा केल्यानंतर कंपनीचे शेअर 1.95 टक्के घसरले. दरम्यान, असे सांगण्यात येत आहे की, कंपनीकडून डिझेलच्या गाड्यांऐवजी पेट्रोल आणि सीएनजीच्या गाड्यांवर जास्त फोकस करण्यात येणार आहे. तसेच, कंपनी काही नवीन मॉडेल्स सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच करणार आहे.