मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:40 IST2025-09-03T16:39:48+5:302025-09-03T16:40:21+5:30

फुल टँकमध्ये ही कार 1200Km एवढे मायलेज देईल...

maruti suzuki new Victoris SUV launched 5-star safety, 10-25-inch infotainment, 360 degree camera and much more; know about the details | मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

मारुती सुझुकी इंडियाने आता भारतीय बाजारात आपली नवी मिडसाईज व्हिक्टोरिस एसयूव्ही सादर केली आहे. ही एसयूव्ही एकूण 6 ट्रिम्स LXI, VXI, ZXI, ZXI(O), ZXI+ आणि ZXI+(O) मध्ये खरेदी करू शकाल. ही एसयूव्ही मारुती सुझुकी अरेना डीलरशिपच्या माध्यमाने विकली जाईल. २०२३ च्या ग्रँड विटारा नंतर, व्हिक्टोरिस ही कंपनीची दुसरी दावेदार आहे. यामुळे, व्हिक्टोरिसची स्पर्धा, मारुतीच्याच ग्रँड विटारासह ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, एमजी अ‍ॅस्टर, होंडा एलिव्हेटशी असेल.

मारुती व्हिक्टोरिसचे फीचर्स -
या एसयूव्हीच्या फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, डॉल्बी अॅटमॉस्टसह 8-स्पीकर साउंड सिस्टिम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अँम्बिएन्ट लायटिंग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, लेदरेट अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ८-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हेड-अप डिस्प्ले, केबिन एअर फिल्टर, पॉवर्ड टेलगेट आणि बरेच काही समाविष्ट आहे.

सेफ्टी फीचर्स -
व्हिक्टोरिसच्या सेफ्टी पॅकेजमध्ये, स्टँडर्डच्या स्वरुपात 6 एअरबॅग्स, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि इतरही काही सुविधा देण्यात आल्या आहेत. हिच्या हायर व्हेरिअंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि मारुती मॉडेलमध्ये पहिल्यांदाच लेवल 2 ADAS ही मिळते. याशिवाय, विक्टोरिसला 5-स्टार भारत NCAP क्रॅश सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.

इंजिन ऑप्शन -
व्हिक्टोरिस साधारणपणे ग्रँड व्हिटारा प्रमाणेच आहे. या कारमध्ये 3 मुख्य पॉवरट्रेन ऑप्शन देण्यात आले आहेत. यात, पहिले 103hp पॉवर असलेले 1.5-लिटर, 4-सिलिंडर माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन, दुसरे 116hp पॉवर असलेले 1.5-लिटर, 3-सिलिंडर स्ट्रॉन्ग हायब्रिड सेटअप आणि तिसरे 89hp पॉवर असलेले 1.5-लिटर पेट्रोल-CNG इंजिन असे पर्याय देण्यात आले आहेत. 

महत्वाचे म्हणजे, CNG व्हेरिअंटसाठी 5-स्पीड मॅन्युअल देण्यात आले आहे. व्हिक्टोरिसमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हचे ऑप्शनही मिळेल. तसेच, फुल टँकमध्ये ही कार 1200Km एवढे मायलेज देईल. याशिवाय इतरही अनेक लक्झरिअस गोष्टींचा या कारमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Web Title: maruti suzuki new Victoris SUV launched 5-star safety, 10-25-inch infotainment, 360 degree camera and much more; know about the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.