35 KM मायलेजसह अनेक स्मार्ट फीचर्स; नवीन अवतारात येणार Maruti ची लोकप्रिय कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:54 IST2026-02-22T13:53:35+5:302026-02-22T13:54:05+5:30

जाणून घ्या किती असेल किंमत...

Maruti Suzuki: Many smart features with 35 KM mileage; Maruti's popular car will come in a new avatar | 35 KM मायलेजसह अनेक स्मार्ट फीचर्स; नवीन अवतारात येणार Maruti ची लोकप्रिय कार...

35 KM मायलेजसह अनेक स्मार्ट फीचर्स; नवीन अवतारात येणार Maruti ची लोकप्रिय कार...

Maruti Suzuki: मारुती सुझुकी भारतात आपली हायब्रिड वाहने वाढवण्याच्या तयारीत असून, कंपनी लवकरच Maruti Fronx Hybrid हे नवे मॉडेल लॉन्च करणार आहे. ही SUV 2026 मध्ये लॉन्च होऊ शकते. टेस्टिंगदरम्यान ही गाडी अनेकदा रस्त्यावर दिसून आली असून, यामध्ये नवे स्ट्रॉंग हायब्रिड तंत्रज्ञान वापरले आहे.

इंजिन अन् हायब्रिड तंत्रज्ञान

Maruti Fronx Hybrid मध्ये कंपनीचे नवे 1.2-लीटर Z12E थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन स्ट्रॉंग हायब्रिड सिस्टीमसोबत काम करेल. ही सीरिज हायब्रिड टेक्नॉलॉजी असून, यामध्ये पेट्रोल इंजिन बॅटरी चार्ज करण्याचे काम करेल, तर इलेक्ट्रिक मोटर थेट चाकांना पॉवर देईल. यामुळे इंधन कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

मायलेजमध्ये मोठी झेप

नव्या हायब्रिड सेटअपमुळे Maruti Fronx Hybrid चे मायलेज 30 ते 35 किमी प्रतिलिटर इतके असू शकते. तुलनेने, सध्याच्या Fronx पेट्रोल मॉडेलचे मायलेज 20.01 ते 22.89 किमी/लीटर, तर CNG वेरिएंटचे मायलेज 28.51 किमी/किलो आहे. त्यामुळे Fronx Hybrid हा इंधन बचतीच्या बाबतीत अधिक फायदेशीर पर्याय ठरू शकतो.

किंमत किती असू शकते?

Maruti Fronx Hybrid ची किंमत सध्याच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, हायब्रिड वर्जनची किंमत पेट्रोल मॉडेलपेक्षा सुमारे 2 ते 2.5 लाख रुपये अधिक असू शकते. सध्या Fronx ची किंमत 7.59 लाख ते 12.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे हायब्रिड वेरिएंटची संभाव्य किंमत 8 लाख ते 15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. 

प्रीमियम फीचर्सचा भरणा

  • Maruti Fronx Hybrid मध्ये  9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • हेड-अप डिस्प्ले (HUD)
  • 360-डिग्री कॅमेरा
  • वायरलेस चार्जिंग
  • व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स
  • सनरूफ

तर, टॉप व्हेरिएंटमध्ये लेव्हल-1 ADAS (Advanced Driver Assistance System) देण्यात येऊ शकते.

सेफ्टी फीचर्स

  • 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड)
  • ABS सोबत EBD
  • इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP)
  • हिल होल्ड असिस्ट
  • रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा
  • ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS)
  • असे फीचर्स समाविष्ट असू शकतात.
     

Web Title : Maruti Fronx Hybrid: शानदार माइलेज और स्मार्ट फीचर्स, जल्द होगी लॉन्च!

Web Summary : मारुति सुजुकी 2026 में फ्रोंक्स हाइब्रिड लॉन्च करने की तैयारी कर रही है। इसमें नए 1.2-लीटर इंजन के साथ स्ट्रॉन्ग हाइब्रिड तकनीक है, जो 30-35 किमी प्रति लीटर का माइलेज देगी। 9-इंच टचस्क्रीन और बेहतर सुरक्षा सुविधाएँ मिलेंगी। कीमत पेट्रोल मॉडल से 2-2.5 लाख अधिक हो सकती है।

Web Title : Maruti Fronx Hybrid: High mileage, smart features, coming soon!

Web Summary : Maruti Suzuki is preparing to launch the Fronx Hybrid in 2026. It features a new 1.2-liter engine with strong hybrid technology, promising 30-35 kmpl mileage. Expect premium features like a 9-inch touchscreen, HUD, and enhanced safety features. The price may be 2-2.5 lakhs higher than the petrol model.