Maruti Brezza आणि Grand Vitara चे सीएनजी मॉडेल लवकरच येणार, जाणून घ्या किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 10:35 IST2022-11-11T10:35:03+5:302022-11-11T10:35:43+5:30
आता कार निर्माता ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या एस-सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. लाँच झाल्यानंतर ही मारुतीची पहिली एसयूव्ही असेल, जी फॅक्टरी फिट सीएनजी किटसह येईल.

Maruti Brezza आणि Grand Vitara चे सीएनजी मॉडेल लवकरच येणार, जाणून घ्या किंमत?
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या सीएनजी (CNG) पोर्टफोलिओचा देशात विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने अलीकडेच भारतात बलेनो (Baleno) आणि एक्सएल 6 च्या एस-सीएनजी व्हर्जन लाँच केल्या आहे. आता कार निर्माता ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या एस-सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. लाँच झाल्यानंतर ही मारुतीची पहिली एसयूव्ही असेल, जी फॅक्टरी फिट सीएनजी किटसह येईल.
आगामी मारुती सुझुकी ब्रेझा एस-सीएनजी आधीच डीलरशिपवर दिसली आहे आणि लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये 1.5-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड बाई- फ्यूल पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन एक्सएल 6 मध्ये सीएनजी मोडमध्ये 86.7 bhp पॉवर आणि 121 Nm टॉर्क जनरेट करते. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येऊ शकते.
Maruti Suzuki Grand Vitara S-CNG
टोयोटोने अर्बन क्रुझर हायराइडर ई-सीएनसीसाठी 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग घेणे सुरू केले आहे. मात्र, अद्याप दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. किमती लवकरच जाहीर केल्या जातील. हायरायडर लॉन्च केल्यानंतर मारुती सुझुकीकडून ग्रँड विटारा एस-सीएनजी लाँच करण्याची शक्यता आहे. या दोन्ही सीएनजी मिड-साइजच्या एसयूव्ही एकमेकांशी मेकॅनिकल्स शेअर करतील. यात फक्त ब्रेझा सीएनजी इंजिन मिळेल.
Maruti Suzuki Brezza, Grand Vitara S-CNG ची किंमत
मारुती सुझुकी लवकरच ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या एस-सीएनजी व्हर्जनच्या किमती जाहीर करू शकते. ज्या ट्रिममध्ये सीएनजी किट ऑफर केली जाईल, ती आपल्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा सुमारे 1 लाख रुपये महाग असेल. सध्या, ब्रेझाची किंमत 7.99 लाख ते 13.96 लाख रुपये आहे तर ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.