भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या, म्हणजेच 'e Vitara' च्या लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे. मात्र, अधिकृत लाँचपूर्वीच या कारच्या किमतीबाबत एक मोठा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. एका वेबसाइटचा स्क्रीनशॉट सध्या तुफान व्हायरल होत असून, त्यामध्ये 'e Vitara' ची किंमत समोर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी e Vitara ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २४.७९ लाख रुपये असू शकते. हा स्क्रीनशॉट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या टेस्टिंग फेजमधील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मारुती सुझुकीने अद्याप या किमतीबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
मारुती e Vitara ची खास वैशिष्ट्ये:बॅटरी आणि रेंज: या कारमध्ये ४९kWh आणि ६१kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची शक्यता आहे. एका चार्जमध्ये ही कार ५०० किमीपेक्षा जास्त रेंज देईल असा अंदाज आहे.
4WD तंत्रज्ञान: मारुती यामध्ये आपले खास 'AllGrip-e' तंत्रज्ञान देणार आहे, ज्यामुळे ही इलेक्ट्रिक SUV ऑफ-रोडिंगसाठी देखील सक्षम असेल.डिझाइन: e Vitara ही सुझुकीच्या नव्या 'HEARTECT-e' प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात आधुनिक डॅशबोर्ड, मोठी टचस्क्रीन आणि प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील.
टाटा आणि ह्युंदाईला देणार टक्करजर ही किंमत खरी ठरली, तर मारुतीची ही इलेक्ट्रिक कार बाजारात आधीच असलेल्या Tata Curvv.ev, MG ZS EV आणि आगामी Hyundai Creta EV ला जोरदार टक्कर देईल. सध्या मारुतीचे चाहते या कारच्या अधिकृत लाँचिंगची आणि किमतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Web Summary : Maruti Suzuki's 'e Vitara' price leaked online before launch, sparking excitement. Expected to offer 500km range, 4WD. It will rival Tata and Hyundai EVs.
Web Summary : मारुति सुजुकी की 'ई विटारा' की कीमत लॉन्च से पहले लीक हो गई, जिससे उत्साह बढ़ गया। 500 किमी रेंज, 4WD मिलने की उम्मीद है। यह टाटा और हुंडई ईवी को टक्कर देगी।