33 KM मायलेजसह मिळतात आधुनिक फीचर्स; 30 लाख लोकांनी खरेदी केली ही दमदार कार..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:43 IST2026-03-16T18:42:33+5:302026-03-16T18:43:23+5:30

Maruti Suzuki Dzire30 लाख विक्रीसह या कारने बाजारात घातला धुमाकूळ!

Maruti Suzuki Dzire comes with powerful features along with a mileage of 33 KM; 30 lakh people have bought this car | 33 KM मायलेजसह मिळतात आधुनिक फीचर्स; 30 लाख लोकांनी खरेदी केली ही दमदार कार..!

33 KM मायलेजसह मिळतात आधुनिक फीचर्स; 30 लाख लोकांनी खरेदी केली ही दमदार कार..!

Maruti Suzuki Dzire : भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडानपैकी एक असलेल्या Maruti Suzuki Dzire ने विक्रीचा मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, 2008 मध्ये लॉन्च झाल्यापासून या कारची देशात 30 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. मजबूत मागणीमुळे ही कार आजही आपल्या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे.

विशेष म्हणजे 2025 मध्येही ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली, गेल्यावर्षी सुमारे 2.14 लाख युनिट्सची विक्री झाली. त्यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये या कारची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

किंमत किती?

सध्या Maruti Suzuki Dzire ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.26 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत बेस LXi व्हेरिएंटसाठी आहे. तर टॉप व्हेरिएंट ZXi Plus ची किंमत सुमारे 9.31 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही किंमत तुमचे शहर, निवडलेल्या व्हेरिएंट आणि अतिरिक्त फीचर्सनुसार बदलू शकते.

2008 मध्ये झाली होती लॉन्च

Maruti Suzuki Dzire ही कार प्रथम 2008 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कारचे चार जनरेशन बाजारात आले आहेत. कंपनीने ही कार “हार्ट कार” म्हणून सादर केली होती. त्यावेळीच या सेडानमध्ये सेगमेंटमधील अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले होते, जसे की ड्युअल फ्रंट एअरबॅग, क्लायमेट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इत्यादी...

या कारच्या पुढील जनरेशनमध्ये अनेक नवे फीचर्स जोडले गेले.

सेकंड जनरेशन:

AGS ऑटोमॅटिक ट्रान्समिशन

ड्युअल-टोन इंटीरियर

थर्ड जनरेशन:

LED प्रोजेक्टर हेडलाइट्स

SmartPlay इन्फोटेनमेंट सिस्टम

टू-टोन अलॉय व्हील्स

फोर्थ जनरेशन:

नवीन Z-सीरीज इंजिन

अधिक आधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्स

सध्याच्या मॉडेलमध्ये अनेक प्रगत फीचर्स 

इलेक्ट्रिक सनरूफ

360 डिग्री HD कॅमेरा

9-इंच SmartPlay Pro+ टचस्क्रीन

वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay

Suzuki Connect (स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटीसह)

Alexa इंटिग्रेशन

सुरक्षा सुविधाही मजबूत

सुरक्षेच्या दृष्टीने या सेडानमध्ये अनेक महत्त्वाच्या सुविधा दिल्या आहेत:

6 एअरबॅग्स

इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP)

हिल होल्ड असिस्ट

ABS + EBD + ब्रेक असिस्ट

ISOFIX चाइल्ड सीट अँकर

या कारला Global NCAP आणि Bharat NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

इंजिन आणि मायलेज

Maruti Suzuki Dzire मध्ये 1.2 लिटर 3-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिन दिले जाते. इंजिन पॉवर 81.58 PS पॉवर, 111.7 Nm टॉर्क मिळतो. तर, यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AGS ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

मायलेज

पेट्रोल मॅन्युअल: सुमारे 24.79 kmpl

AGS ऑटोमॅटिक: सुमारे 25.71 kmpl

CNG व्हेरिएंट: 33.73 km/kg पर्यंत

Web Title : Maruti Suzuki Dzire: लोकप्रिय कार, बेहतरीन फीचर्स और माइलेज के साथ बिक्री।

Web Summary : Maruti Suzuki Dzire, एक लोकप्रिय कॉम्पैक्ट सेडान, ने 2008 से 3 मिलियन से अधिक यूनिट बेचे हैं। 33 किमी/किग्रा (CNG) तक के माइलेज, सनरूफ और उन्नत सुरक्षा जैसे आधुनिक फीचर्स के लिए जानी जाने वाली, यह अभी भी अपने सेगमेंट में शीर्ष पसंद है।

Web Title : Maruti Suzuki Dzire: Popular car boasts features, mileage, and sales.

Web Summary : Maruti Suzuki Dzire, a popular compact sedan, has sold over 3 million units since 2008. Known for its mileage up to 33 km/kg (CNG), modern features like a sunroof and advanced safety, it remains a top choice in its segment.