शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी तगडा झटका, पुन्हा किंमत वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 4:08 PM

भारतातील कार निर्मात्‍यांनी एक ट्रेंड बनवला आहे, जवळजवळ सर्वच वाहन निर्माते दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपल्या गाड्यांच्या किमती वाढवतात. मारुती सुझुकीने यावर्षी तर आपल्या कारच्या किमती ३ वेळा वाढविल्या आहेत.

नवी दिल्ली - 2021 हे वर्ष ग्राहक आणि वाहन निर्माते दोघांसाठीही खूपच वाईट ठरले. या वर्षात कार निर्मात्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. तसेच, खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगत जवळपास प्रत्येक कंपनीने कारच्या किमती वाढविल्या आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. आता 2022 हे वर्षही ग्राहकांच्या खिशावर आणखी भार टाकणारेच असल्याचे दिसत आहे. विक्रीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2022 पासून पुन्हा त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

उत्पादन खर्चात वाढ -नॅशनल स्टॉक ऐक्सचेंजच्या फायलिंगमध्ये मारुती सुझुकीने जानेवारी 2022 पासून कारच्या किंमती वाढविण्याची माहिती दिली आहे. कंपनीने उत्पादन खर्चातील वाढ हे यामागचे कारण सांगितले आहे. तसेच उत्पादन खर्चात झालेल्या वाढीचा काही भाग ग्राहकांवर टाकणे आपली मजबुरी असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. मात्र, किंमतीत नेमकी किती वाढ केली जाईल, यासंदर्भात अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. तसेच नेमक्या कोण-कोणत्या कारच्या किंमती वाढणार हेही अद्याप समोर आलेले नाही.

मारुती सुझुकीने याच वर्षात तब्बल 3 वेळा वाढवल्या कारच्या किंमती -भारतातील कार निर्मात्‍यांनी एक ट्रेंड बनवला आहे, जवळजवळ सर्वच वाहन निर्माते दर वर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपल्या गाड्यांच्या किमती वाढवतात. मारुती सुझुकीने यावर्षी तर आपल्या कारच्या किमती ३ वेळा वाढविल्या आहेत. अशात किंमत वाढविण्याचा हा निर्णय आश्चर्यचकित करणारा नाही. मारुती सुझुकीच्या या निर्णयानंतर, आता इतरही कार उत्पादक कंपन्या आपल्या कारच्या किंमती वाढविण्याची घोषणा करू शकतात. यामुळे पुढील वर्षापासून मारुती सुझुकीची कार घेणे आणखी महाग होणार आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीIndiaभारतbusinessव्यवसाय