शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

मारुतीची भन्नाट ऑफर! 'या' दमदार एसयूव्हीवर आता ३.३ लाखापर्यंत डिस्काउंट, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:28 IST

मारुती सुझुकी जिम्नी ही कार महिंद्रा थारची स्पर्धक म्हणून ओळखली जाते.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचेकार देशभरात खूप लोकप्रिय आहेत. यातच मारुती सुझुकी जिम्नी ही कार महिंद्रा थारची स्पर्धक म्हणून ओळखली जाते. मात्र, एसयूव्ही लाँच झाल्यानंतर ऑटो मार्केटमध्ये फारशी क्रेझ दिसून आली नाही. यामागील कारण म्हणजे कारची किंमत. 

मारुतीची ही कार असूनही तिची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये बसत नाही. पण, आता कंपनी जिम्नीवर डिस्काउंट ऑफर देत आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील लवकरच नवीन मारुती कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. मारुती जिम्नी ही जीटा आणि अल्फा अशा दोन व्हेरिएंटमध्ये येते. या कारची किंमत १२.७४ लाख ते १५.०५ लाख रुपये, जी एक्स-शोरूम दरम्यान आहे. या एसयूव्हीवर ग्राहकांना ३.३ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

मारुती जिम्नीवर ऑफरजिम्नीच्या ऑफरवर १.७५ लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे. जो कारच्या एंट्री लेव्हल जीटा व्हेरिएंटवर लागू आहे. तसेच, कारच्या अल्फा व्हेरिएंटवर १.८० लाख रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय, १.५० लाख रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सवलती देखील दिल्या जात आहेत, ज्या मारुती सुझुकीची फायनान्स सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध असतील. दरम्यान, ग्राहकांच्या लक्षात असू द्या की, या सवलतीच्या ऑफर डीलरशिप आणि क्षेत्रानुसार बदलू शकतात.

मारुती जिम्नीचे इंजिनजिम्नी एसयूव्हीमध्ये १,४६२cc नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे निष्क्रिय स्टार्ट-स्टॉप फंक्शन आहे. त्याचे आउटपुट १०३ bhp आणि १३४.२ Nm टॉर्क आहे आणि ते ५-स्पीड मॅन्युअल किंवा ४-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. मारुती सुझुकीच्या मते, जिम्नी मॅन्युअल १६.९४ kmpl चा मायलेज देते तर ऑटोमॅटिक व्हर्जन १६.३९ kmpl मायलेज देते. 

मारुती जिम्नीमधील फीचर्सजिम्नीमध्ये फोर व्हिल ड्राइव्ह (4X4) ऑल प्रो सिस्टम देण्यात आली आहे. या SUV मध्ये कंपनीने आर्कमिजच्या प्रिमियम सराऊंड साऊंड सिस्टमचा वापर केला आहे. या SUV ला वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay आणि Arcams द्वारे साउंड सिस्टमसह ९-इंच टचस्क्रीन डिस्प्ले देखील मिळतो.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार