सिंगल चार्जमध्ये तब्बल 550 km रेंज; लवकरच लॉन्च होणार Maruti Suzuki ची EV कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 06:10 PM2023-12-08T18:10:42+5:302023-12-08T18:11:14+5:30

Maruti Suzuki Upcoming Electric Car: या कारचे उत्पादन मारुती सुझुकीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये केले जात आहे.

Maruti eVX SUV: A whopping 550 km range on a single charge; Maruti Suzuki's EV car to be launched soon | सिंगल चार्जमध्ये तब्बल 550 km रेंज; लवकरच लॉन्च होणार Maruti Suzuki ची EV कार

सिंगल चार्जमध्ये तब्बल 550 km रेंज; लवकरच लॉन्च होणार Maruti Suzuki ची EV कार

Maruti eVX SUV: इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता मारुती सुझुकी नवीन आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर बऱ्याच दिवसांपासून काम करत असू, या कारच्या कॉनसेप्ट मॉडेलला eVX असे नाव देण्यात आले आहे. सध्या ही कार टेस्टिंग फेजमध्ये आहे. या कारचे उत्पादन मारुती सुझुकीच्या गुजरातमधील हंसलपूर प्लांटमध्ये केले जात आहे.

सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने मार्च 2022 मध्ये गुजरात सरकारसोबत या इलेक्ट्रिक कारबाबत एक मेमोरँडम केला होता. या करारांतर्गत कंपनी हंसलपूर प्लांटमध्ये 3100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, या ठिकाणी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन होणार आहे. सध्या या प्लांटमध्ये किती गाड्या बनवल्या जातील, याचा तपशील समोर आलेला  नाही. 

मारुती सुझुकीच्या EV कारमध्ये काय असेल खास?
कंपनीच्या मते, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही हायटेक फीचर्सने सुसज्ज असेल. यात 60kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाईल. रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक कार एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 550 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. 

मारुती eVX SUV च्या कॉनसेप्ट मॉडलेनुसार, या गाडीची लांबी 4.3 मीटर असेल. तसेच, रुंदी 1.8 मीटर, उंची 1.6 मीटर आणि व्हीलबेस 2.7 मीटर असेल. कारचे प्रोडक्शन मॉडेलही याच आकारात असेल अशी अपेक्षा आहे. भारतात लॉन्च केल्यानंतर मारुती सुझुकी eVX महिंद्रा XUV400, MG ZS EV आणि Hyundai च्या आगामी इलेक्ट्रिक Creta शी स्पर्धा करेल.

Web Title: Maruti eVX SUV: A whopping 550 km range on a single charge; Maruti Suzuki's EV car to be launched soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.