Video: तुमची Maruti Dzire ईलेक्ट्रीकमध्ये कन्व्हर्ट करता येणार; वेगात नेक्सॉन ईव्हीलाही मागे टाकणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:22 AM2021-07-15T11:22:39+5:302021-07-15T11:34:27+5:30

Maruti Dzire electric car conversion kit:  प्रत्येक कारसाठी एकसारखेच किट बसेलच असे नाही. कारचा प्लॅटफॉर्म, वजन आणि अन्य भागदेखील खूप महत्वाचे असतात. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कारसाठी मुळापासून सुरुवात करावी लागते. डिझायरसाठी Northway Motorsport ने मोटर, कंट्रोलर आणि अन्य भाग बनविले आहेत. पहा या डिझायरची रेंज, चार्जिंग आदी फिचर्सबाबत.

Maruti Dzire electric car conversion kit Video: Maruti Dzire EV will left behind Tata Nexon EV | Video: तुमची Maruti Dzire ईलेक्ट्रीकमध्ये कन्व्हर्ट करता येणार; वेगात नेक्सॉन ईव्हीलाही मागे टाकणार...

Video: तुमची Maruti Dzire ईलेक्ट्रीकमध्ये कन्व्हर्ट करता येणार; वेगात नेक्सॉन ईव्हीलाही मागे टाकणार...

Next

Maruti Suzuki Dzire EV: देशात हळूहळू इलेक्ट्रीक कारची मागणी वाढू लागली आहे. जगभरातही जास्त रेंजच्या कार लाँच होत आहेत. भारतात मात्र ही रेंज काहीशी कमी आहे. परंतू पुढील काही वर्षांत हे तंत्रज्ञान विकसित होणार आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी वॅगन आरच्या ईलेक्ट्रीक व्हेरिअंटवर काम करत आहे. मात्र, मारुती सुझुकीच्याच डिझायरचे (Maruti Suzuki Dzire) ईलेक्ट्रीक व्हर्जन तयारही झाले आहे. होय, Northway Motorsport ने डिझायरमध्ये बदल करून ती ईव्हीमध्ये कन्व्हर्ट करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी विकसित केलेले किट वापरले आहे. चला जाणून घेऊया या ईव्ही बद्दल... (Northway Motorsport who has converted a Maruti Suzuki Dzire compact sedan into a fully electric car using their own kit)

Maruti Suzuki: मारुतीचा ग्राहकांना झटका; Swift सह CNG कारच्या किंमती वाढविल्या, जाणून घ्या...

प्रत्येक कारसाठी एकसारखेच किट बसेलच असे नाही. कारचा प्लॅटफॉर्म, वजन आणि अन्य भागदेखील खूप महत्वाचे असतात. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कारसाठी मुळापासून सुरुवात करावी लागते. डिझायरसाठी Northway Motorsport ने मोटर, कंट्रोलर आणि अन्य भाग बनविले आहेत. 
महत्वाची बाब म्हणजे ईव्हीमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर या कारचे सस्पेन्शन किंवा टायर बदलण्याची गरज राहणार नाही. यामुळे हा पर्याय एक स्वस्त पर्या ठरू शकतो. कंपनीने अनेक पार्ट हे पेटंटसाठी पाठविल्याने त्यावर जास्त माहिती दिलेली नाही. परंतू जी दिलीय ती मोठा दिलासा देणारी आहे. कारण ही कार टाटाची लोकप्रिय कार नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी आहे. 

वेग वाढला... (Maruti Suzuki Dzire EV Range)
मारुती डिझायरची पेट्रोल व्हर्जनची कार 0 ते 100 किमीचा वेग 12 सेकंदात गाठते. मात्र, ईव्ही १० सेकंदात. ईव्हीचे इंजिन सेटअप हा नेक्सॉनच्या सेटअपपेक्षा छोटा आहे. मात्र, टॉप स्पीड हा 160 किमी प्रति तास आहे. तर नेक्सॉन ईव्हीचा टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. या रेसमध्ये ही डिझायर टाटा नेक्सॉन ईव्हीला (nexon EV) मागे टाकते. 

CNG Car: मारुतीच्या ताफ्यात आणखी एक CNG कार येणार; डिझायर टेस्टिंगवेळी स्पॉट

रेंज किती.... (Maruti Suzuki Dzire EV charging)
बॅटरीची रेंज ही बॅटरी पॅकवर अवनलंबून आहे. 20 KwH ची बॅटरी डिझायरला 240 किमीची रेंज देते. नेक्स़ॉन मात्र इथे उजवी ठरते. फास्ट चार्जिंग आणि इनबिल्ट चार्जर देण्यात येतो. सामान्य चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात तर फास्ट चार्जरने ही कार एका तासाच्या आत चार्ज होते. 

बॅटरी ही कारच्या आतमध्ये किंवा बॉनेटमध्ये ठेवता येत असल्याने डिक्की वाया जात नाही. जे किट या डिझायरमध्ये वापरण्यात आले आहे, ते टेस्टिंगसाठी मान्यता मिळविलेले आहे. व्यापारासाठी अद्याप मान्यता मिळायची आहे. 
 

Web Title: Maruti Dzire electric car conversion kit Video: Maruti Dzire EV will left behind Tata Nexon EV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app