दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:15 PM2024-05-29T16:15:29+5:302024-05-29T16:15:44+5:30

Mahindra XUV 700 AX5 Select Launch: महिंद्राने ही नवीन XUV 700 AX5 सिलेक्ट पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे.

Mahindra XUV 700 AX5 Select Launch: Powerful engine and attractive looks; Mahindra Launches New XUV 700 AX5 Select, Check Price | दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत...

दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत...

Mahindra XUV 700 AX5 Select Features : भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय बाजारपेठेत Mahindra XUV 700 AX5 सिलेक्ट व्हेरिएंट लॉन्च केले आहे. पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये ही उपलब्ध असेल. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत रु. 16.89 लाख (एक्स-शोरूम) ठेवली आहे. या एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले असून, लवकरच डिलिव्हरीदेखील सुरू होईल. 

Mahindra XUV 700 AX5 किंमत 
Mahindra XUV 700 AX5 सिलेक्टच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, MT व्हेरिएंट पेट्रोल एसयूव्हीची किंमत 16.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर AT व्हेरिएंट पेट्रोल एसयूव्हीची किंमत 18.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याच्या डिझेल MT मॉडेलची किंमत 17.49 लाख रुपये तर AT मॉडेलची किंमत 19.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. 

कशी आहे Mahindra XUV 700 AX5 
नवीन Mahindra XUV 700 AX5 सिलेक्ट सेव्हन सीटर असून, यात पॅनोरॅमिक सनरुफ, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, इंफोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी 10.25-इंच स्क्रीन, Amazon Alexa, वायरलेस Apple CarPlay/Android ऑटो, सहा स्पीकर्स, LED DRL, अशी अनेक वैशिष्ट्ये मिळतील. शिवाय, याचे 2.2-लिटर टर्बो डिझेल इंजिन 185hp आणि 420Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. तर, पेट्रोल इंजिन 2.0-लिटर टर्बो पेट्रोल आहे, जे 200hp पॉवर आणि 380Nm टॉर्क जनरेट करते.

Web Title: Mahindra XUV 700 AX5 Select Launch: Powerful engine and attractive looks; Mahindra Launches New XUV 700 AX5 Select, Check Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.