हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:16 IST2025-10-03T15:15:26+5:302025-10-03T15:16:04+5:30
Mahindra Thar 2025 Facelift: महिंद्रा थार (3-डोर) २०२५ फेसलिफ्ट ₹10 लाखात लाँच. 10.25" स्क्रीन, रिअर AC व्हेंट्ससह मोठी फीचर्सची यादी!

हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
भारताची सर्वात लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही महिंद्रा थार (Mahindra Thar) ने नव्या रुपात एन्ट्री केली आहे. आधीच्या थार ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीने यात बदल केलेले आहेत. थार 3-डोर फेसलिफ्टची किंमत कंपनीने जीएसटी कमी झाला तरी तेवढीच ठेवली आहे.
कंपनी या बदलांना 'मिड-सायकल एन्हान्समेंट' म्हणत आहे. नवीन थारमध्ये बाहेरील बदलांपेक्षा आतील भागात जास्त बदल करण्यात आले आहेत. जुन्या थारमधील स्क्रीनऐवजी आता १०.२५-इंचची मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. यात 'ॲडव्हेंचर स्टॅटिस्टिक २' हे खास फीचर आहे, जे ऑफ-रोडिंग करताना गाडीचा कोन, उतार (स्लोप) आणि भूभाग (टेरेन) यांसारखी माहिती दाखविते.
अनेक वर्षांपासून थारचे युजर मागे एसी व्हेंट देण्याची मागणी करत होते. ती कंपनीने ऐकली आहे. तसेच आणखी एक मागणी पॉवर विंडोचे कंट्रोल स्विचेस जे पूर्वी सेंटर कन्सोलवर होते, ते आता दरवाजांवर (Doors) शिफ्ट करण्यात आले आहेत. बाहेरील बदल म्हणाल तर नवीन डुअल-टोन बंपर, बॉडी-कलर्ड ग्रिल आणि मागच्या बाजूला रिअर वायपर आणि वॉशरसह रिअर कॅमेरा जोडण्यात आला आहे.
बॅटलशिप ग्रे (Battleship Grey) आणि टँगो रेड (Tango Red) अस दोन नवे रंग पर्याय देण्यात आले आहेत.
इंजिन आणि परफॉर्मन्स
२०२५ थारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच २.०-लिटर टर्बो पेट्रोल (150 hp) आणि २.२-लिटर डिझेल (130 hp) हे दोन पर्याय मिळतील.
२.०-लिटर टर्बो पेट्रोल: १५० एचपी पॉवर, ३२० Nm टॉर्क. ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध.
२.२-लिटर डिझेल: १३० एचपी पॉवर, ३०० Nm टॉर्क. केवळ ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन.
ऑफ-रोडिंगसाठी ४x४ सिस्टीम, २२६ मिमीचा ग्राउंड क्लीअरन्स आणि हिल-होल्ड/हिल-डिसेंट कंट्रोलसारखे फीचर्स कायम आहेत.