Mahindra ची मोठी उडी; EV कारच्या विक्रीत 8785 % वाढ, तरीपण Tata टॉपवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 04:07 PM2024-03-14T16:07:04+5:302024-03-14T16:07:47+5:30

Mahindra EV Sales: मागील काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

Mahindra EV Sales: Mahindra's strong performance; Electric car sales up 8785%, yet Tata on top | Mahindra ची मोठी उडी; EV कारच्या विक्रीत 8785 % वाढ, तरीपण Tata टॉपवर

Mahindra ची मोठी उडी; EV कारच्या विक्रीत 8785 % वाढ, तरीपण Tata टॉपवर

Mahindra EV Sales: मागील काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रीक टू-व्हिलरसह इलेक्ट्रीक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. ही मागणी पाहता अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रीक कार भारतात लॉन्च केल्या आहेत. सध्या भारतात टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार विभागात आघाडीवर आहे. टाटाच्या Punch EV, Nexon EV, Tiago EV आणि Tigor EV मुळे इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये कंपनीचा सुमारे 70% वाटा आहे. 

दुसरीकडे, एका वर्षातील वाढीबद्दल बोललो तर महिंद्राने यात खूप चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 8,785 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, महिंद्राकडे EV स्पेसमध्ये जास्त उपलब्ध मॉडेल नाहीत.

महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओमध्ये फक्त एकच मॉडेल आहे, ती म्हणजे XUV400. महिंद्राने फेब्रुवारी 2023 मध्ये फक्त 7 युनिट्सची विक्री केली होती, तर एका वर्षानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीने 622 युनिट्स विकले. म्हणजेच, विक्री वार्षिक आधारावर 8,785 टक्क्यांनी वाढली. 

या विक्रीसह महिंद्रा इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये तिसरी सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी ठरली आहे. यामध्ये टाटा मोटर्स पहिल्या तर MG Motors दुसऱ्या स्थानावर आहे. Tata Motors ने फेब्रुवारी 2024 मध्ये 4,941 इलेक्ट्रिक कार विकल्या, तर  MG ने फेब्रुवारी 2024 मध्ये 1,053 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. या आकड्यांसह फेब्रुवारी 2024 मध्ये टाटा मोटर्स, एमजी आणि महिंद्रा अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Web Title: Mahindra EV Sales: Mahindra's strong performance; Electric car sales up 8785%, yet Tata on top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.