शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

Mahindra: महिंद्राच्या या वाहनांच्या फ्युअल पाईपमध्ये मोठा दोष; तब्बल 30000 गाड्या मागे बोलावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 5:57 PM

Mahindra recall: फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपली थार एसयुव्हीच्या डिझेल व्हेरिअंटला रिकॉल केले होते. १५७७ युनिट्स माघारी बोलविण्यात आले होते. या वाहनांच्या इंजिनच्या भागात सदोष कॅमशेफ्ट लावला गेला होता. तो बदलण्यात आला.

एसयुव्ही, माल वाहतुकीच्या छोट्या गाड्यांची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Mahindra and Mahindra (महिंद्रा अँड महिंद्रा) ने मंगळवारी खराब असेम्ब्लीच्या शंकेमुळे फ्ल्यूअल पाईप बदलण्यासाठी आपली पिकअप वाहने रिकॉल केली आहेत. येत्या काळात 29,878 वाहने माघारी बोलावण्यात आली आहेत. (Mahindra to recall nearly 30,000 pickup trucks due to fluid pipe issue.)

दिल बडा होना चाहिए! एथरने दुसऱ्या कंपन्यांच्या इ-स्कूटरसाठी फास्ट चार्जरचा पेटंटच खुला केला

महिंद्राने म्हटले की, कंपनीने असेंब्लीमध्ये शंका असल्याने जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2020 मध्ये बनविण्यात आलेल्या काही पिकअप गाड्यांच्या फ्युएल पाईपचे निरीक्षण करण्यासाठी आणि बदलण्यासाठी माघारी बोलविल्या आहेत. 

Video: आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय! कंपनीची वर्षानुवर्षाची ओळख 'पुसणार'; लोगो बदलणार

निरीक्षण आणि दुरुस्ती मोफत केली जाणार आहे. या गाड्यांच्या मालकांना डीलरशिपकडून व्यक्तीगतरित्या फोन केले जातील. आपल्या ग्राहकांसाठी त्रासमुक्त अनुभव देण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या प्रमुखांनी सांगितले. 

Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद

गेल्या महिन्यात कंपनीने नाशिकच्या फॅक्टरीमध्ये बनलेल्या काही वाहनांच्या डिझेल इंजिनांचे सक्रीय निरीक्षण आणि बदलण्याची घोषणा केली होती. फॅक्टरीतील दुषित इंधनामुळे स्पेअर पार्ट लवकर खराब होण्याची शक्यता होती. कंपनीने केलेला हा रिकॉल 21 जून आणि 2 जुलै 2021 दरम्यान बनलेल्या 600 वाहनांसाठी होता. तर फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपली थार एसयुव्हीच्या डिझेल व्हेरिअंटला रिकॉल केले होते. १५७७ युनिट्स माघारी बोलविण्यात आले होते. या वाहनांच्या इंजिनच्या भागात सदोष कॅमशेफ्ट लावला गेला होता. तो बदलण्यात आला.

टॅग्स :Mahindraमहिंद्रा