Mahindra: एअर कंडिशनिंग केबिन, ड्रायव्हरसाठी रिक्लाइनर सीट; जबरदस्त फीचर्ससह बोलेरो कॅम्पर लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:40 IST2026-01-21T17:37:06+5:302026-01-21T17:40:44+5:30

Mahindra Bolero Camper Pickup New Launch: महिंद्राने आपली लोकप्रिय वाहने बोलेरो कॅम्पर आणि बोलेरो पिक-अप नवीन लूकमध्ये लॉन्च केला आहे. आता ही वाहने केवळ मजबूतच नाहीत, तर अधिक आधुनिक आणि हाय-टेक झाली आहेत.

mahindra bolero camper pickup new launch price features | Mahindra: एअर कंडिशनिंग केबिन, ड्रायव्हरसाठी रिक्लाइनर सीट; जबरदस्त फीचर्ससह बोलेरो कॅम्पर लॉन्च!

Mahindra: एअर कंडिशनिंग केबिन, ड्रायव्हरसाठी रिक्लाइनर सीट; जबरदस्त फीचर्ससह बोलेरो कॅम्पर लॉन्च!

भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली दोन अत्यंत लोकप्रिय व्यावसायिक वाहने, बोलेरो कॅम्पर आणि बोलेरो पिक-अप, नवीन अवतारात लॉन्च केली आहेत. कंपनीने यावेळी केवळ बाह्य लूकवरच नाही, तर टेक्नोलॉजी आणि सुरक्षेसह चालकाच्या आरामदायी प्रवास करता येईल, यावर भर दिला आहे. 

नवीन बोलेरो कॅम्पर आता iMAXX टेलिमॅटिक्स सिस्टमने सुसज्ज आहे, ज्यामुळे मालकांना वाहनाचे रिअल-टाइम लोकेशन आणि कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणे सोपे होईल. तसेच नवीन डेकल्स, बॉडी-कलर्ड ओआरव्हीएम (ORVM) आणि आधुनिक डोअर हँडल्समुळे याला प्रीमियम लूक मिळाला आहे. शिवाय, केबिनमध्ये एअर कंडिशनिंग, हीटर आणि ब्लूटूथ कॉलिंगसह म्युझिक सिस्टम देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मागील सीटवर हेडरेस्ट आणि ड्रायव्हरसाठी रिक्लाइनर सीट उपलब्ध आहे. यात २.५-लिटर टर्बोडिझेल इंजिन आहे जे ८० BHP पॉवर आणि २०० एनएम टॉर्क जनरेट करते. हे वाहन २डब्ल्यूडी आणि ४डब्ल्यूडी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

बोलेरो पिक-अपमध्येही मोठा बदल

व्यावसायिक क्षेत्रात दबदबा असलेल्या बोलेरो पिक-अपलाही आता आधुनिक सोयीसुविधांची जोड देण्यात आली आहे. पुढच्या भागात नवीन डिझाइन आणि केबिनमध्ये अधिक जागा देण्यात आली आहे. ड्रायव्हरसाठी रिक्लाइनर सीट आणि सह-प्रवाशासाठी रुंद सीटमुळे लांबचा प्रवास थकवामुक्त होईल. सर्व ऋतूंमध्ये सुलभ प्रवासासाठी आता यात एअर कंडिशनिंग आणि हीटरची सोय करण्यात आली आहे.

बोलेरो पिक-अप: किंमत

बोलेरो पिकअपच्या एमएस सीबीसी व्हेरिएंटची किंमत ९ लाख १९ हजार आहे. एमएस एफपी व्हेरिएंटची किंमत ९ लाख ७० हजार आहे. पीएस एफबीची किंमत ९ लाख ७५ हजार आहे. पीएस एफबी एसी व्हेरिएंट ९ लाख ९९ हजार आहे. फोर-व्हील ड्राइव्ह ४डब्लू सीबीसी व्हेरिएंटची किंमत ९ लाख ५० हजार आहे. याशिवाय, ४ डब्लूडीची व्हेरिएंटची किंमत ९ लाख ७३ हजार आहे. तर, ४डब्लूडी एसी व्हेरिएंटची किंमत ९ लाख ९९ हजार आहे.

Web Title : एसी केबिन और रिक्लाइनर सीट के साथ बोलेरो कैम्पर लॉन्च!

Web Summary : महिंद्रा ने बोलेरो कैम्पर और पिकअप को iMAXX, एसी, रिक्लाइनर सीटों के साथ लॉन्च किया। बेहतर आराम, तकनीक और डिजाइन व्यावसायिक जरूरतों को पूरा करते हैं। कीमतें जारी।

Web Title : Bolero Camper Launched with AC Cabin and Recliner Seat!

Web Summary : Mahindra launched Bolero Camper & Pickup with iMAXX, AC, recliner seats. Enhanced comfort, technology, and design meet commercial needs. Prices revealed.