ठळक मुद्देकारमध्ये देण्यात आले आहेत जबरदस्त सेफ्टी फीचर्सलवकरच भारतात लाँच होणार

दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Kia Motors नं अलीकडेच भारतीय बाजारात पाऊल ठेवलं आहे. परंतु अत्यंत कमी कालावधीत ही कंपनी अतिशय लोकप्रिय झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने आपली परवडणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही किआ सोनेट भारतीय बाजारात बाजारात लाँच केली होती. आता कंपनी त्या कारचं 7- सीटर व्हर्जन बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

पण भारतात लाँच करण्यापूर्वी कंपनीनं इंडोनेशियातील बाजारपेठेत ही कार लाँच केली आहे. जगातील हा पहिला देश आहे जिथे हे मॉडेल लाँच केलं गेलं आहे. लवकरच ती भारतीय बाजारातही आणली लाँच केली जाईल. भारतीय बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या 5 सीटर कारच्या तुलनेत यात अधिक फरक नसला तरी यामध्ये मागील बाजूला आणखी दोन अतिरिक्त सीट्स देण्यात आल्या आहेत.
 


कशी आहे ही कार ?

कंपनीनं या नव्या मॉडेलमध्ये सनरूफ काढून टाकला आहे. जेणेकरून सर्वात मागील बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही एसीचं कुलिंग अनुभवता येईल. मध्यभागी असलेल्या सीटच्या हेडरेस्डमध्ये एसी व्हेंट देण्यात आले आहे. याशिवाय दुसऱ्या रो मधील सीट्स प्रवाशांना रिक्लाईनदेखील करता येणार आहेत. कंपनीनं सोनेटच्या या नव्या व्हर्जनला इंडोनेशियन बाजारात Premiere 7  असं नाव दिलं आहे. या  कारमध्ये कनेक्टिव्हीटी फीचर्स म्हणून ब्लूटूथ, व्हॉईस रेकग्नायझेशन आणि युएसबी दिले आहेत. 
 


जबरदस्त सेफ्टी फीचर्स

सुरक्षेसाठीही कंपनीनं अनेक फीचर्स दिले आहेत. यामध्ये एबीएस, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन. ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, इमरजन्सी स्टॉप सिग्नल, रिअर कॅमेरा, डायनॅमिक पार्किंग गाईड, रिमोट इंजिन स्टार्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखे फीचर्स दिले आहेत.


इंजिन आणि किंमत

या कारमध्ये कंपनीनं 1.5 लिटर क्षमतेचं स्मार्टस्क्रिन ड्युअल CVVT इंजिन दिलं आहे. जे 115PS पॉवर आणि 144Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. तसंच ही कार सहा रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये क्लियर व्हाइट, इंटिलिजन्स ब्लू, इंटेंस रेड, स्टील सिल्वर, ऑरोरा ब्लॅक पर्ल आणि बिज गोल्ड या रंगांचा समावेश आहे. इडोनेशियन बाजारात या काची किंमत 199,500,000 (इंडोनेशियन रूपया) 

Web Title: Made In India 7 Seater Kia Sonet Revealed With 1 5L Petrol Engine know features and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.