अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400km रेंज, ऑटो शोमध्ये या EV वर सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:49 PM2023-11-26T18:49:05+5:302023-11-26T18:53:26+5:30

Los Angeles Auto Show 2023: लॉस एंजेलिसमध्ये ऑटो शो चा आज शेवटचा दिवस होता. आज अनेक कंपन्यांनी आपल्या कार सादर केल्या.

Los Angeles Auto Show: 400km range in just 15 minutes charge, all eyes on these EV at auto show | अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400km रेंज, ऑटो शोमध्ये या EV वर सर्वांच्या नजरा

अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400km रेंज, ऑटो शोमध्ये या EV वर सर्वांच्या नजरा

Los Angeles Auto Show 2023: अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात ऑटो शो सुरू आहे. हा कार्यक्रम यासाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यात सहभागी होण्यासाठी कंपन्यांना किमान एक इलेक्ट्रिक कार शो करावी लागणार आहे. या शोमध्ये होंडा, व्होल्वो, किया, शेवरलेट, ल्युसिड, फोर्ड, पोर्श या कंपन्या सहभागी होत आहेत. या शोमध्ये इलेक्ट्रिक कारवर बरेच लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी EV फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाचे अनावरणदेखील करण्यात आले. नवीन तंत्रज्ञानाद्वारे इलेक्ट्रिक वाहने 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 400 किलोमीटर धावतील.

लॉस एंजेलिस ऑटो शो केवळ जलद चार्जिंग तंत्रज्ञानामुळे चर्चेत आला नाही, तर अनेक उत्तम इलेक्ट्रिक कार आणि कॉन्सेप्ट कारदेखील येथे मांडण्यात आल्या आहेत. यावेळी Lucid Gravity ने सर्वाधिक लक्ष वेधले आहे. ही एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, जी आकर्षक डिझाइन आणि सर्वाधिक रेंजसह येते. 

Lucid Gravity: सर्वाधिक श्रेणीची ई-एसयूव्ही


ल्युसिड ग्रॅव्हिटी ही सर्वात जास्त रेंज असलेली इलेक्ट्रिक एसयूव्ही मानली जाते. लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये या नवीन ईव्हीने सर्वांचेच लक्ष्य वेधले आहे. ही 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 708 किलोमीटर अंतर कापू शकते. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 66 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Hofer Powertrain: 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 400 किमी


हॉफर पॉवरट्रेनने (Hofer Powertrain) ऑटो शोमध्ये प्रगत तंत्रज्ञान सादर केले आहे. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक वाहनांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने दावा केला आहे की, त्यांची EV 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 400 किलोमीटरचे अंतर कापेल. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक वाहनात वापरल्यास चार्जिंगचा ताण दूर होईल.

Aitekx RoboTruck: सायबर ट्रकसारखा ट्रक


टेस्ला सायबरट्रकसारखा दिसणारा ट्रकही लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये दाखवण्यात आला आहे. हा ट्रक 3.5 सेकंदात सुमारे 100 किमी प्रति तासाचा वेग गाठू शकतो. इलेक्ट्रिक ट्रकच्या रेंजबद्दल सांगायचे तर, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा ट्रक 885 किलोमीटरचे अंतर कापेल.

Kia EV3 आणि EV4: Kia च्या नवीन इलेक्ट्रिक कार


किआने अमेरिकन ऑटो शोमध्ये नवीन कार सादर केल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या कंपनीने EV3 आणि EV4 कॉन्सेप्ट कारचे प्रदर्शन केले. EV3 ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV आहे, तर EV4 ही इलेक्ट्रिक सेडान कार आहे. सध्या, Kia ने या दोन कारची बॅटरी, रेंज, टॉप स्पीड यासारखे तपशील शेअर केलेले नाहीत.

Web Title: Los Angeles Auto Show: 400km range in just 15 minutes charge, all eyes on these EV at auto show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.