Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 21:07 IST2025-07-16T21:04:31+5:302025-07-16T21:07:35+5:30
7 Seater Budget Cars: तुमचे कुटुंब मोठे आहे आणि त्यामुळे तुम्ही मोठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
तुमचे कुटुंब मोठे आहे आणि त्यामुळे तुम्ही मोठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतीय बाजारात अनेक ७ सीटर कार उपलब्ध आहेत, ज्या कमी किंमतीत मोठी जागा आणि चांगले मायलेज देतात. दरम्यान, या सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेल्या तीन सर्वात परवडणाऱ्या ७-सीटर कारबद्दल जाणून घेऊयात.
१) रेनॉल्ट ट्रायबर
रेनॉल्ट ट्रायबर ही भारतातील सर्वात परवडणारी ७-सीटर कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत ६.१५ लाख ते ८.९८ लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये १.०-लिटर ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे ७१ बीएचपी पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. काही डीलरशिपमध्ये रेनॉल्ट ट्रायबर सीएनजी किटसह देखील खरेदी करता येते.
२) मारुती सुझुकी एर्टिगा
मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतातील सर्वाधिक पसंतीची ७-सीटर कार आहे, ज्याची किंमत ८.९७ लाख ते १३.२६ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. यात १.५ लिटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे, जे १०३ बीएचपी पॉवर आणि १३८ एनएम टॉर्क देते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि सीएनजी आवृत्तीमध्ये देखील खरेदी करता येते. एर्टिगाचे पेट्रोल मॉडेल प्रति लिटर २०.५१ किमी पर्यंत मायलेज देते, तर सीएनजी आवृत्ती प्रति किलो २६.०८ किमी पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारमध्ये ४ एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्ससारखी सेक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
३) टोयोटा रुमियन
टोयोटा रुमियन ही मारुती अर्टिगाची पुनर्निर्मित आवृत्ती आहे आणि तिची डिझाइन आणि इंटिरियर एर्टिगासारखेच आहे. तिची एक्स-शोरूम किंमत १०.५४ लाख ते १३.८३ लाख रुपयांपर्यंत आहे, जी एर्टिगापेक्षा थोडी जास्त आहे. रुमियनमध्ये १.५-लिटर के-सिरीज पेट्रोल इंजिन देखील आहे, जे १०२ बीएचपी पॉवर आणि १३७ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह खरेदी करता येते. शिवाय, यात सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे.