जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:41 IST2025-09-08T16:41:19+5:302025-09-08T16:41:56+5:30

Car Stock Yard in Flood Water: शेतकऱ्यांचे उभे पिक वाहून गेले आहे. गायी, म्हशी वाहून गेल्या आहेत. घरातील सर्व वस्तू खराब झाल्या आहेत. अशातच कार शोरुमवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

Life is broken...! Thousands of new empty cars turned into garbage; Maruti, Hyundai cars submerged in flood | जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

पुरामुळे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उभे पिक वाहून गेले आहे. गायी, म्हशी वाहून गेल्या आहेत. घरातील सर्व वस्तू खराब झाल्या आहेत. अशातच कार शोरुमवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मारुती, ह्युंदाई सारख्या कंपन्यांच्या डीलरनी हजारो कारचा स्टॉक आणून ठेवला होता. तो पुराच्या पाण्यामुळे आता कचरा झाला आहे. 

 असाच एक व्हिडीओ हरियाणातून येत आहे. पंजाब, दिल्ली, जम्मू आणि हरियाणा सारखी राज्ये गेल्या काही दिवसांपासून पुराच्या पाण्यात आहेत. याठिकाणी आताही अनेक भागात पाणी आहे. हे पाणी ओसरत असताना आता लोकांचे बुडालेले पैसे दिसत आहेत. 

हरियाणाच्या जझ्झरमध्ये मारुती सुझुकीच्या ३०० नव्या कोऱ्या कार पुराच्या पाण्यात बुडाल्या आहेत. मारुतीच्या स्टॉकमधील या गाड्या आहेत. यामध्ये अल्टो १०, ब्रेझा, वॅगनआर, इनव्हिक्टो सारख्या गाड्या आहेत. अनेक गाड्यांच्या एअरबॅग उघडलेल्या अवस्थेत आहेत. लाईट ऑन दिसत आहेत. अनेकांमध्ये आतमध्ये चिखल आणि पाणी भरलेले आहे. हे पाणी ओसरायला आणखी काही दिवस लागणार आहेत. सर्व इलेक्ट्रॉनिक पार्ट खराब झालेले असणार आहेत. 

काही ठिकाणी या गाड्या दुरुस्त करून ग्राहकांना देण्याचे प्रकारही होणार आहेत. या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना पीडीआय करणे आणि मेकॅनिकला नेऊन गाडी दाखविणे आदी सावधगिरी बाळगावी लागणार आहे.  

Web Title: Life is broken...! Thousands of new empty cars turned into garbage; Maruti, Hyundai cars submerged in flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.