KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:22 IST2025-10-20T14:20:55+5:302025-10-20T14:22:30+5:30
ही कार सिंगल चार्जवर ५४८ किलोमीटरची जबरदस्त रेंज देते. हिच्या पॉवरचा विचार करता, हिचे पॉवर आउटपुट २४५ PS तर टॉर्क ३५० Nm आहे...

KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
मुंबई: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर के.एल. राहुलने नुकतीच एमजी एम९ इलेक्ट्रिक एमपीव्ही (MG M9 Electric MPV) खरेदी केली आहे. हे मॉडेल घेणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरला आहे. ही कार म्हणजे केवळ एक वाहन नसून, चालतं-फिरतं हॉटेलच आहे.
किंमत आणि परफॉर्मन्स -
एमजी एम९ इलेक्ट्रिक एमपीव्ही ही भारतात केवळ एकाच, 'प्रेसिडेन्शिअल लिमो' या टॉप व्हेरियंटमध्ये लाँच झाली आहे. हिची एक्स-शोरूम किंमत ₹६९.९० लाख एवढी आहे. ही कार ९० kWh बॅटरी पॅकसह येते, जी सिंगल चार्जवर ५४८ किलोमीटरची जबरदस्त रेंज देते. हिच्या पॉवरचा विचार करता, हिचे पॉवर आउटपुट २४५ PS तर टॉर्क ३५० Nm आहे. यात V2V आणि V2L (दुसऱ्या गाड्या किंवा उपकरणे चार्ज करण्याचे) तंत्रज्ञानही आहे.
आलिशान इंटीरिअर -
एमजी एम९ चे केबिन एवढे प्रिमियम आहे की, कुणीही हिला, 'चालते फिरते हॉटेल' म्हणेल. हिचे केबीन कॉग्नॅक आणि ब्लॅक ड्युअल टोन थीममध्ये तयार करण्यात आले आहे. यात ब्रश्ड ॲल्युमिनियम आणि वुड फिनिशचा वापर आहे. यात १६-व्या इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटसह 'कॅप्टन सीट्स' दिल्या आहेत, ज्यात हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज सुविधा उपलब्ध आहे.
कारमध्ये १२-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम -
या कारमध्ये १२-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम, १२.२३-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ३६०° कॅमेरा, लेव्हल-२ ADAS आणि मागील प्रवाशांसाठी डिस्प्लेसारखे फीचर्स आहेत, जे या कारला '५-स्टार हॉटेलचा प्रायव्हेट लाऊंज' असा अनुभव देतात. यामुळेच ही कार आता सेलिब्रिटींची नवी पसंती बनत आहे.