'ई-लूना प्राइम' भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये १४० KM रेंज, किंमत फक्त ८२,४९० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:24 IST2025-09-26T16:23:41+5:302025-09-26T16:24:19+5:30
Kinetic Green ने आपली बहुप्रतिक्षित E-Luna Prime मोपेड ₹८२,४९० (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च केली आहे. सिंगल चार्जमध्ये 140 KM ची रेंज देणाऱ्या या मोपेडचे दमदार फीचर्स, बुकिंगची माहिती आणि खास वैशिष्ट्ये मराठीत वाचा.

'ई-लूना प्राइम' भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये १४० KM रेंज, किंमत फक्त ८२,४९० रुपये
पुणे: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, दुचाकी उत्पादक काइनेटिक ग्रीनने (Kinetic Green) आपली ई-मोपेड 'ई-लूना प्राइम' (E-Luna Prime) लॉन्च केली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील बदलत्या गरजा आणि गतिशीलता (Personal Mobility) लक्षात घेऊन ही मोपेड खास डिझाइन करण्यात आली आहे.
नवीन 'ई-लूना प्राइम' मोपेडमध्ये कंपनीने दोन बॅटरीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ही मोपेड सिंगल चार्जवर ११० किलोमीटर आणि कमाल १४० किलोमीटरपर्यंतची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत (Ex-Showroom Price) ८२,४९० रुपये निश्चित केली आहे. 'ई-लूना प्राइम' सहा आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
आधुनिक फीचर्स
या इलेक्ट्रिक मोपेडमध्ये अनेक आधुनिक आणि उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट (LED Headlight), डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (Digital Instrument Cluster), सिंगल सीट, रिम टेप्स (Rim Tapes), बॉडी डिकेल्स आणि पंचर-प्रतिरोधक ट्यूबलेस टायर्स (Tubeless Tyres) यांसारख्या सोयींचा समावेश आहे.