Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:24 IST2025-10-30T19:20:45+5:302025-10-30T19:24:19+5:30
Kawasaki Versys-X 300 Launched: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च झाली असून त्यांची केटीएम ३९० अॅडव्हेंचर आणि रॉयल एनफील्ड ४५० यांसारख्या लोकप्रिय बाईकशी स्पर्धा असेल.

Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
प्रीमियम मोटरसायकल उत्पादक कंपनी कावासाकीने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या लोकप्रिय व्हर्सिस-एक्स ३०० या मॉडेलची २०२६ आवृत्ती लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने बाईकच्या एक्स-शोरूम किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. व्हर्सिस-एक्स ३०० ही बाईक पूर्वीच्याच ₹३.४९ लाख (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध राहील. या किमतीमुळे ही बाईक अजूनही भारतात उपलब्ध असलेली सर्वात परवडणारी ट्विन-सिलेंडर अॅडव्हेंचर टूरर ठरली आहे.
२०२६ च्या आवृत्तीत कावासाकीने व्हर्सिस-एक्स ३०० मध्ये केवळ रंगामध्ये बदल केला. नवीन मॉडेल सिंगल ड्युअल-टोन पेंट स्कीममध्ये उपलब्ध असेल. यामध्ये काळा आणि हिरवा या रंगांचे आकर्षक कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबतच बाईकमध्ये रिफ्रेश केलेले ग्राफिक्स देखील मिळत आहेत. नवीन रंगाव्यतिरिक्त, बाईकच्या फीचर्स आणि इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
व्हर्सिस-एक्स ३०० ही इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत साधी आणि आरामदायी मोटरसायकल आहे. यात ब्लूटूथ, राइड मोड्स किंवा ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखी आधुनिक फीचर्स नाहीत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे केवळ आवश्यक माहिती प्रदर्शित करणारे सेमी-डिजिटल युनिट आहे. ही बाईक भारतीय बाजारपेठेत केटीएम ३९० अॅडव्हेंचर आणि रॉयल एनफील्ड ४५० यांसारख्या लोकप्रिय अॅडव्हेंचर टूररला टक्कर देतील, असा दावा करण्यात आला आहे.