भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत
By देवेश फडके | Updated: February 17, 2021 15:28 IST2021-02-17T15:26:51+5:302021-02-17T15:28:13+5:30
कबिरा मोबिलिटी या कंपनीने भारताची पहिली हायस्पीड फास्टेस्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही बाइक KM3000 आणि KM4000 या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत
नवी दिल्ली : कबिरा मोबिलिटी या कंपनीने भारताची पहिली हायस्पीड फास्टेस्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही बाइक KM3000 आणि KM4000 या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामधील KM4000 ही बाइक भारतातील आतापर्यंतची सर्वांत फास्टेस्ट बाइक मानली जात आहे. (kabira mobility launched indias fastest high speed electric bike)
KM3000 आणि KM4000 या दोन्ही बाइक्सची बॅटरी २ तास ५० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. तर, बूस्ट चार्ज पर्यायाचा वापर केल्यास अवघ्या ५० मिनिटांत चार्ज होऊ शकते. ईको चार्ज मोडचा वापर केल्यास याला ६ तास ३० मिनिटे लागतात, असे सांगितले जात आहे.
Royal Enfield Himalayan 2021 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
KM3000 मध्ये कंपनीने 4kWh बॅटरीचा वापर केला आहे. ही बाइक इकॉनॉमी मोडमध्ये १२० कि.मी. तर, स्पोर्ट्स मोड मध्ये ६० कि.मी. रेंज ऑफर करते. तर, काब्रिया मोबिलिटी कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या KM4000 या बाइकला 4.4kWh ची बॅटरी दिली आहे. इको मोडमध्ये ही बाइक १५० कि.मी.चे तर, स्पोर्ट्स मोडमध्ये ९० कि.मी. चे अंतर कापू शकते. KM4000 या बाइकचा टॉप स्पीड १२० कि.मी. आहे.
कबिरा मोबिलिटीच्या KM3000 या इलेक्ट्रिक बाइकची किंमत एक लाख २६ हजार ९९० रुपये, तर KM4000 या इलेक्ट्रिक बाइकची किंमत एक लाख ३६ हजार ९९० रुपये ऑफर केली आहे.