Joy e-Bike Mihos: फ्रीमध्ये बुक करा इलेक्ट्रीक स्कूटर; 100 किमीची रेंज, किंमत एवढी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 13:23 IST2023-01-21T13:22:39+5:302023-01-21T13:23:27+5:30
स्कूटरच्या लॉन्चिंगदरम्यान कंपनीने बॉडीवर हातोडा मारून दाखविला होता. या स्कूटरची बॉडी पॉली डायसायक्लो पेंटाडीनपासून बनविण्यात आली आहे.

Joy e-Bike Mihos: फ्रीमध्ये बुक करा इलेक्ट्रीक स्कूटर; 100 किमीची रेंज, किंमत एवढी...
देशात इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढत चालली आहे. ऑटो एक्स्पोमध्ये देखील इलेक्ट्रीक वाहनांचा जलवा पहायला मिळाला आहे. याच ऑटो एक्स्पोमध्ये वार्डविझार्ड कंपनीने ईलेक्ट्रीक टू व्हीलर ब्रँड Joy e-Bike ची एक इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली होती. आता ही स्कूटर हाय स्पीड इलेक्ट्रीक स्कूटर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच याची बुकिंगही उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.
महत्वाचे म्हणजे बुकिंगसाठी कोणतीही अमाऊंट घेतली जाणार नाहीय. Joy e-Bike Mihos असे या स्कूटरचे नाव आहे. याची बुकिंग फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने ही स्कूटर 1.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. मात्र, ही किंमत पहिल्या 5,000 ग्राहकांसाठीच लागू असेल.
या स्कूटरची बॉडी पॉली डायसायक्लो पेंटाडीनपासून बनविण्यात आली आहे. स्कूटरच्या लॉन्चिंगदरम्यान कंपनीने बॉडीवर हातोडा मारून दाखविला होता. नवीन मिहोसमध्ये स्मार्ट आणि आरामदायी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की हे भारतीय रस्ते लक्षात घेऊन डिझाइन केले आहे, या स्कूटरला 175 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, या स्कूटरला साइड स्टँड सेन्सर, हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखी वैशिष्ट्ये आहेत.
2.5 kWh क्षमतेचे Li-Ion बॅटरी पॅक वापरण्यात आले आहे. एका चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळते. 1500W इलेक्ट्रिक मोटर 95 Nm चा टॉर्क जनरेट करते. सामान्य चार्जरने बॅटरी अवघ्या 4 तासांत पूर्ण चार्ज होते. ही स्कूटर 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 7 सेकंदात पकडते, असा दावा कंपनीने केला आहे.