Jawa Yezdi ची ईअर एंड ऑफर; एक्सचेंज, EMI वर मिळतायेत अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:35 IST2023-12-12T13:35:13+5:302023-12-12T13:35:47+5:30
December Discount on Bikes: कंपनी जावा 42 आणि येझडी रोडस्टर मॉडेल्सवर एक्सचेंज बेनिफिट देखील देत आहे.

Jawa Yezdi ची ईअर एंड ऑफर; एक्सचेंज, EMI वर मिळतायेत अनेक फायदे!
नवी दिल्ली : प्रीमियम बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जावा येझडीने (Jawa Yezdi) आपल्या बाईक्सवर डिसेंबर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनी या ऑफरचा लाभ ग्राहकांना अतिरिक्त वॉरंटी, राइडिंग गिअर्स आणि अॅक्सेसरीजसह ईएमआय (EMI) स्वरूपात देत आहे. याशिवाय, कंपनी जावा 42 आणि येझडी रोडस्टर मॉडेल्सवर एक्सचेंज बेनिफिट देखील देत आहे.
31 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जावा येझडी आपल्या सर्व मॉडेल्सवर चार वर्षांपर्यंत किंवा 50,000 किलोमीटरपर्यंत अतिरिक्त वॉरंटी देत आहे. साधारणपणे कंपनी दोन वर्षे आणि 24,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते, मात्र डिसेंबरमध्ये बाईक खरेदी केल्यावर कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता एक्सटेंडेड वॉरंटीचा लाभ दिला जात आहे.
जावा येझडी मोटारसाइकलद्वारे आयडीएफसीटच्या (IDFC) सहकार्याने आपल्या सर्व बाईक मॉडेल्सवर ईएमआय (EMI) ऑफर लाँच केली आहे. या अंतर्गत, तुम्ही दरमहा केवळ 1,888 रुपये EMI भरून बाईक घरी नेऊ शकता. याचबरोबर, जावा येझडी मोटारसाइकलने जावा 42 आणि येझडी रोडस्टरच्या सिंगल टोन मॉडेल्सवर विशेष एक्सचेंज ऑफर जारी केली आहे. कंपनी बाईक एक्सचेंजवर ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ देत आहे.
दरम्यान, जावा येझडी ही एक प्रीमियम बाईक कंपनी आहे. भारतात जावाचे चार मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्याची किंमत 1,83,000 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये सर्वात लोकप्रिय बाइक 42 बॉबर, 42 आणि पेराक आहेत. जावाची सर्वात महागडी बाईक 42 बॉबर आहे, ज्याची किंमत सुमारे 2,27,000 रुपये आहे. तसेच, येझडीचे 3 मॉडेल भारतात उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय रोडस्टर, अॅडव्हेंचर आणि स्क्रॅम्बलर आहेत. येडदी बाईकची किंमत 2,08,000 रुपयांपासून सुरू होते.