शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक लॉन्च, सिंगल चार्जवर २२० किमी रेंज अन् किंमत किती जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 6:54 PM

भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते.

भारतात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक (Indias First Electric Cruiser Bike) कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लॉन्च झाली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अगदी हार्ले डेविडसनसारखी (Harley Davidson) दिसते. वीजेवर चालणारी ही बाईक सिंगल चार्जवर १८० ते २२० किमी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा खुद्द कंपनीनं केला आहे. बाईकमध्ये ४ हजार वॉटची मोटर बसवण्यात आली आहे. कंपनीनं ही बाईक एकूण तीन रंगात उपलब्ध केली आहे. यात Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या रंगांचा समावेश आहे. बाईकची किंमत १.६८ लाखांपासून सुरू होते. या बाईकसोबतच कंपनीनं कोमाकी वेनिस (Komali Venice) देखील लॉन्च केली आहे. 

कोमाकी वेनिस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आयसी क्रूझरचं इंजिनचा वापर केला आहे. जे हार्ले डेविडसन आणि रॉयल एनफील्ड इत्यादी बाईक्समध्ये याआधीपासून वापरण्यात येत आहे. इलेक्ट्रिक क्रूझर बाईकमध्ये ग्रोसर व्हील्स, क्रोम एक्टीरियर्स आणि फाइन पेंट जॉबचा वापर केला गेला आहे. या मोटारसायकलमध्ये 4kW ची बॅटरीचा वापर केला गेला आहे. जी भारतातील सर्वात मोठी टू-व्हिलर बॅटरी आहे. बाईक सिंगल चार्जमध्ये १८०-२०० किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज उपलब्ध करुन देते. 

Komaki Ranger चे फिचर्सकोमाकी रेंजर बाईकमध्ये ब्लूटूथ साऊंड सिस्टम, साइट स्टँड सेंसर, क्रूझर कंट्रोल फिचर्स, अँडी थेफ्ट लॉकिंग सिस्टम असे अत्याधुनिक फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यासोबतच ड्युअल स्टोरेज बॉक्सचा पर्याय देखील उपलब्ध आहे. चालकाचा विचार करुन यात आरामदायक सीट देण्यात आली आहे. तसंच ट्रिपल हेड लँपचा वापर करण्यात आला आहे. 

किंमत आणि उपलब्धताकोमाकी रेंजर क्रूझर बाईक २६ जानेवारी रोजी कोमाकी डीलरशीपकडून तुम्हाला विकत घेता येणार आहे. याची एक्स शो रुम किंमत १.६८ लाखांपासून सुरू होत आहे. 

 

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरHarley-Davidsonहार्ले डेव्हिडसन