भारत-EU करार! फॉर्च्यूनरपेक्षा लँड रोव्हर डिफेंडर स्वस्त होणार; 50 लाखांच्या आत..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:22 IST2026-01-29T14:21:58+5:302026-01-29T14:22:34+5:30

India-EU Trade Deal: India-EU करारामुळे लक्झरी कार बाजारात उलथापालथ; ग्राहकांना मोठा फायदा

India-EU Trade Deal: Land Rover Defender will be cheaper than Fortuner due to India-EU agreement; Within 50 lakhs..? | भारत-EU करार! फॉर्च्यूनरपेक्षा लँड रोव्हर डिफेंडर स्वस्त होणार; 50 लाखांच्या आत..?

भारत-EU करार! फॉर्च्यूनरपेक्षा लँड रोव्हर डिफेंडर स्वस्त होणार; 50 लाखांच्या आत..?

India-EU Trade Deal: अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भारत आणि युरोपीय युनियनमधील मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. या कराराचा भारतासह EU ला मोठा लाभ होणार आहे. विशेषत: युरोपमधून भारतात आयात होणाऱ्या लक्झरी कारच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. CBU (Completely Built Unit) स्वरूपात आयात होणाऱ्या गाड्यांवरील आयात शुल्क कमी होणार असल्याने भारतीयांची लोकप्रिय लँड रोव्हर डिफेंडरची किंमतदेखील मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

CBU कारवरील आयात शुल्कात कपात

India-EU FTA अंतर्गत युरोपमधून भारतात आयात होणाऱ्या पूर्णतः निर्मित कारवरील (CBU) आयात शुल्कात टप्प्याटप्प्याने कपात करण्यात येणार आहे. सध्या 110 टक्के असलेले आयात शुल्क पहिल्या टप्प्यात 40 टक्के, तर अंतिम टप्प्यात 10 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. ही सवलत केवळ CBU मॉडेल्सनाच लागू होणार असून, देशांतर्गत असेंबल केलेल्या गाड्यांना याचा लाभ मिळणार नाही.

डिफेंडर चर्चेत...

लँड रोव्हर डिफेंडर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय लक्झरी एसयूव्हींपैकी एक असून, कंपनीची देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. याआधी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार लागू झाल्यानंतर रेंज रोव्हरच्या किमती कमी झाल्या होत्या; मात्र डिफेंडरचे उत्पादन स्लोव्हाकियामध्ये होत असल्याने त्याला त्या सवलतीचा लाभ मिळाला नव्हता. आता India-EU FTA मुळे डिफेंडरवरही आयात शुल्क कपात लागू होणार आहे.

  • भारतामध्ये लँड रोव्हर डिफेंडर 110 ची एक्स-शोरूम किंमत: 1.03 कोटी रुपये
  • BCF (मूल्य): सुमारे 35 लाख रुपये
  • आयात शुल्क (110%): सुमारे 38.5 लाख रुपये
  • GST (40%): सुमारे 29 लाख रुपये
  • नव्या टॅरिफनंतर किती होऊ शकते किंमत?
  • 40% आयात शुल्क लागू झाल्यास : आयात शुल्क: सुमारे 14 लाख रुपये
  • GST: सुमारे 19.6 लाख रुपये
  • एक्स-शोरूम किंमत: सुमारे 68.6 लाख रुपये
  • अंतिम टप्प्यात (10% आयात शुल्क) :
  • अंतिम एक्स-शोरूम किंमत: सुमारे 53.9 लाख रुपये

फॉर्च्यूनरपेक्षा स्वस्त होईल का डिफेंडर?

सध्या टोयोटा फॉर्च्यूनरची एक्स-शोरूम किंमत 34.16 लाख ते 49.59 लाख रुपये दरम्यान आहे. अंदाजे पाहता, अंतिम टप्प्यात डिफेंडरची किंमत फॉर्च्यूनरपेक्षा किंचित जास्तच राहील; मात्र लक्झरी SUV सेगमेंटमध्ये ही मोठी किंमत कपात मानली जात आहे.

Web Title : भारत-ईयू व्यापार समझौता: लैंड रोवर डिफेंडर की कीमत 50 लाख से कम हो सकती है

Web Summary : भारत-ईयू व्यापार समझौते से लग्जरी कारों पर आयात शुल्क कम होगा। लैंड रोवर डिफेंडर की कीमत में भारी गिरावट की संभावना है, जो लगभग 50 लाख तक पहुंच सकती है। इससे सीबीयू मॉडल को फायदा होगा, लग्जरी एसयूवी सुलभ होंगी।

Web Title : India-EU Trade Deal: Land Rover Defender price may fall below ₹50L

Web Summary : India-EU trade deal slashes import duties on luxury cars. Land Rover Defender price may significantly decrease, potentially nearing ₹50 lakhs. This benefits CBU models, making luxury SUVs more accessible.