टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 07:00 AM2017-09-19T07:00:00+5:302017-09-19T07:00:00+5:30

टायर योग्यवेळी बदलणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तुमची कार ज्या टायरवर धावत असते, त्या टायरची योग्य काळजी व योग्यवेळी बदलल्य़ाविना सुरक्षित प्रवासाला अचूक आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा टायरकडे कायम लक्ष असणे गरजेचे आहे.

If you have to change the tire, change immediately ... Do not risk your life! | टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

ठळक मुद्देट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतातअर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातचखराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय

कारच्या टायरबाबत तशा बऱ्याच बाबी आहेत, त्या प्रत्येक कार चालक व मालकाने लक्षात घ्यायला हव्यात पण अनेकदा अतिआत्मविश्वास, कंजूषपणा आणि दुर्लक्ष यामुळे टायर बदलले जात नाहीत, परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. टायर फुटणे, टायर फाटणे,ट्यूब बाहेर पडणे ट्यूबलेस टायर असेल व गरम होऊन फुटला तर वाहन वेगात असेल तर काय होईल, ते न जाणो, अतकी भीषणता टायरकडे दुर्लक्ष झाल्याने होऊ शकते. वाहन व वाहतुकीचे नियम पाळताना तुम्ही तुमच्या वाहनाच्या मग ती कार असो, एसयूव्ही असो की बस असो वा ट्रक असो टायरची काळजी अतोनात घेणे हे तुमच्या व अन्य लोकांच्या प्राणाच्यादृष्टीनेही घेणे गरजेचे आहे. टायरबाबत अनेकजण इतके बेफिकीर असतात, की त्यांना विचारले की त्यांच्याकडून मिळणारी उत्तरे ऐकली की, नको त्यांना ते सांगणे असे वाटते.

साधारणपणे ट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतात. अर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातच. ते खराबही होऊ शकतात. खराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय., वेगामध्ये व खराब रस्ता असतानाही झटकन वळवण्याची सवय, हवा कमी वा अधिक ठेवण्याची सवय वा चूक, टायरला कट गेला असेल तरी तसाच वापरणे,अलाईनमेंट न करणे किंवा टायर रोटेशन न करता वापरणे, टायरवरील नक्षी घासली गेली व टायरच्या खळग्यातील एक विशिष्ट मर्यादा ओलांडली तरी तो वापरणे, एका बाजूने घासला गेला तरी वापरणे अशा  विविध कारणांचा यात समावेश आहे.

टायर अजून चालेल, पावसाळ्यानंतर बदलू, डिझाईन इतके काही खराब नाही झालेले,रिमोल्ड करून वापरू, मी काही जास्त वेगात कार नाही चालवत, फार रनिंगही नसते माझे अशीही कारणे देत टायर बदलण्याची गरज नाही, याचे समर्थन करणारेही अनेक लोक आहेत. टायर हा तुमच्या वाहनाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याच्या खराब असण्याने अपघात होऊ शकतात, गंभीर अपघातही होऊ शकतात, हेच अनेकांना कळत नाही,. पैसे वाचवण्याच्या नावाखाली कंजूषपणा करीत आपल्याच प्राणाशी खेळणारे कार चालक, मालक पाहिले की मात्र कार वापरण्यासाठी असणारी भारतीय मानसिकता समजून येते. वास्तविक टायर उद्योग हा अतिशय मोठा व पर्याय देणारा असून टायर घेताना त्याबाबत चार लोकांशी बोलून व त्या अनुषंगाने टायरची निवड करणे गरजेचे आहे. टायरसारखी महत्त्वाची बाब दुर्लक्षून चालणार नाही.

Web Title: If you have to change the tire, change immediately ... Do not risk your life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.