शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:26 AM

जगातील सर्वात उंचीवर जात या कारने गिनिज बुकमध्ये नाव कोरले आहे. तिबेटच्या सावुला पास या ठिकाणी तब्बल 5731 मीटर उंचीवर ही कार चालविण्य़ात आली. याआधी 5715.28 मीटर उंचीवर चालविण्याचा विक्रम निओ ईएस80 या कारच्या नावे होता. 

ह्युंदाईची भारतीय बनावटीची इलेक्ट्रीक कार कोनाने जागतिक विक्रम केला आहे. जगातील सर्वात उंचीवर जात या कारने गिनिज बुकमध्ये नाव कोरले आहे. तिबेटच्या सावुला पास या ठिकाणी तब्बल 5731 मीटर उंचीवर ही कार चालविण्य़ात आली. याआधी 5715.28 मीटर उंचीवर चालविण्याचा विक्रम निओ ईएस80 या कारच्या नावे होता. 

ह्युंदाईची ही कार एका सामान्य पोर्टेबल चार्जरद्वारे चार्ज करण्यात येत होती. तीव्र चढणीच्या रस्त्यावर कारने अजिबात संघर्ष केला नाही, असा दावा कंपनीने केला आहे. ह्युंदाईचे भारतातील कार्यकारी अधिकारी एस एस किम यांनी सांगितले की, कोना इलेक्ट्रीकमुळे ह्युंदाईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. इलेक्ट्रीक वाहनांबाबतच्या अफवांना कोनाने खोटे ठरविले आहे. कोनाने जगातील सर्वात कठीण भागात यशस्वीपणे जात तिच्यातील ताकद सिद्ध केली आहे.

ह्युंदाईच्या कोनामध्ये 100 किलो वॅटची मोटार देण्यात आलेली आहे. तर या मोटारला 39.2 किलो वॅटची बॅटरी ताकद पुरविते. यामुळे 131 बीएचपीची ताकद निर्माण होते. तर 395 एनएम टॉर्क मिळतो. या इलेक्ट्रीक एसयुव्हीची रेंज एका चार्जिंगमध्ये 452 किमी आहे. तर बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी साध्या चार्जरद्वारे सात ते आठ तास लागतात. जर फास्ट चार्जर असेल तर हीच बॅटरी 80 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 1 तास लागतो.  

वाहतूक कोंडीपासून होणार सुटका; पुढील 3 वर्षात येणार हवेत उडणारी कार?Hyundai Grand i10 Nios नव्या ढंगात लाँच; पहिल्यांदाच छोट्या कारमध्ये भन्नाट फिचर्ससर्वात सुरक्षित कार Tata Nexon EV येणार; एका चार्जिंगमध्ये 300 किमी धावणारReview: टाटाची स्वस्तातली 'रेंज रोव्हर' खरंच साजेशी आहे का? वाचा TATA Harrier कशी आहे... Hyundai Kona Electric ने बर्फवृष्टी, उणे तापमान आणि बर्फाच्छादित रस्त्यांवर चांगले प्रदर्शन केले. पोर्टेबल चार्जर 15 अँम्पिअरच्या सॉकेटमध्ये वापरता येतो. तर फास्ट चार्जरसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. कोनाचे ग्राहक हा चार्जर ह्युंदाई डिलरशीपमधून घेऊ शकतात. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन